Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )

व गुजराथ या तीनहि प्रांतांत यांची वस्ती आहे, पण रोटीबेटी-व्यवहार मात्र चालू नाही. ह्या लहानशा जातीचे सुद्धा बेटीव्यवहाराला बंद असे पंचवीस पोटविभाग आहेत. त्यांच्यापैकी काहीं आडनांवेंहि ध्यानात ठेवण्यासारखी आहेत-आपटे, भिसे, चव्हाण, धोंगडे, गाइकवाड, जाधव, जगताप, जोगदंड, कांबळे, लोंढे, मोहिते, मोरे, नांदे, पवार, साठे; शिंदे इत्यादि. यांचा मुख्य धंदा नाडे, चहाटें करण्याचा आहे.
 ढोरांपैकी बरेचसे लिंगायत आहेत. बुधलेकरी, बुंदेलखंडी, हिंदुस्थानी, कर्नाटकी, खेतरपुडी, लिंगायत इत्यादि पोटविभाग असून त्यांच्यांत रोटीबेटीव्यवहार बंद आहेत.यांच्यापैकीहि कांहीं आडनांवें मनोरंजक वाटतील--बोराडे, गाइकवाड, होळकर, इंगळे, कदम, मानकर, साळुके, शिंदे इत्यादि.. जितकी आडनावे तितकी देवके असून एकाच देवकांत लग्नसंबंध होत नाहीत. कातडें कमावणे हा त्यांचा मुख्य धंदा असून कमावलेल्या कातड्याच्या बाजारांत मांडण्यासारख्या चिजा तयार करणे हे कामहि काही लोक करतात. यामध्ये पुष्कळजण वारकरी आहेत. त्यांच्या जातीचाच स्वतंत्र असा गुरु म्हटला म्हणजे "कानफाट्या गोसावी" हा आहे, व तो आपली वार्षिक दक्षिणा आपल्या शिष्यशाखेकडून नियमितपणे उकळतो.
 आपला मूळ पुरुष एक शिवभक्त होता असें चांभारांचे म्हणणे आहे. कोणी कोणी हा मूळपुरुषत्वाचा अधिकार मार्कंडेय ऋषीला देतात व बाकीच्या अस्पृश्यांतच हे मोडत असल्याने व बाकीचे अस्पृश्य अनार्य असल्यामुळे या लोकांनाहि सामान्यतः मूळ अनार्य प्रजेपासून उत्पन्न झालेल्या लोकांत मोडण्यात येते. पण हे लोक आर्य प्रजेपैकी असावेत असे आधुनिक शोधकांचे म्हणणे आहे. रंगाने हे लोक बाकीच्या अस्पृश्यांपेक्षां उजळ असतात व त्यांच्या-