Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४२ )

इकडून परत जातांना, आमच्यापैकी पुष्कळांना त्याने अयोध्येस बरोबर नेले, व आमचा विश्वासूपणा लक्षात घेऊन आम्हांस रखवालीचे काम सांगितले; त्याने आम्हांवर बापासारखे प्रेम केले व म्हणून आम्ही आमच्या जातीला 'रामवंशी' म्हणजे रामोशी असें नांव घेतले असा स्वतःच्या पूर्वपीठिकेचा इतिहास रामोशी लोक सांगतात. इतक्या उंच नांवाशी आपला संबंध घडून आल्यामुळे पुष्कळांनी मांसाशनहि वर्ज केले. त्यांना रामभक्त असे म्हणतात. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या हद्दीवरील बेरडांशी यांचा पुष्कळच सारखवटपणा आहे व म्हणून या दोघांची कुलपरंपरा एकच असावी असें कांहींचे मत आहे. अर्थात् या उभयतांनाहि हे एककुलत्व पसंत नसेल. रामोश्यांचे बांदाट्टे, बेरड, हळणे, कडू, मांग इत्यादि पोटविभाग असून त्या प्रत्येकाचे पुनः चव्हाण व जाधव असे बारीक भाग आहेत. मराठा-कुणबिणीशी लग्ने झाल्यामुळे कडू नांवाची जात, व मांगिणीशी झाल्यामुळे मांग रामोशी ही जात उत्पन्न झाली असे म्हणतात. पूर्वीच्या राज्यांत यांच्याकडे किल्लेदाराचे काम असे. लग्ने वगैरे चालविण्यास देशस्थ ब्राह्मण कोठे कोठे जातो. इतर समारंभ व संस्कार जंगम लोकहि चालवितात. यांच्याच जातींतील गुरु "गोसावी" हे होत.
 मांग लोकांचा मूळ पुरुष यमऋषि. त्याला सात मुलगे. पैकी कर्कमुनीला दोन मुलगे झाले. यांपैकी पहिल्याने शंकराची गाय खाली म्हणून त्याला, 'तू महार हो' असा शंकराने शाप दिला, व दुसऱ्याने प्रत्यक्ष जरी खाल्ली नाही, तरी त्याच्या अंगावर त्या मेलेल्या गायीच्या रक्ताचा शिडकाव झालेला होता म्हणून त्याला 'तूं मांग हो' असा शाप दिला. असो. ह्या कथेचा अर्थ कांहीं असो, चेहरेपट्टी व रंग यांवरून हेहि आर्यांची वसाहत होण्याच्या पूर्वीचे येथील रहिवासी होते. महाराष्ट्र, कर्नाटक