Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

マをマ गांव-गाडr. किंवा हिंदू गांठून कसाबाला गाय विकण्याची हूल दाखवितात आणि तसें न करण्यासाठीं त्यांजवळून पैसे घेऊन अखेर करावयाचें तेंच करतात. कायदा न मोडतां ज्याला जो धंदा करतां येतो, तो तो करणारच. त्यापासून त्याला पराड्मुख करण्यासाठीं इतर त्याची मूठ कोठवर दाबणार ? ह्याप्रमाणें सार्वजनिक हित व एकमेकांचा परामर्ष ह्यांविषयीं बेपरवाई वाढत गेली; आणि वीत वीत टीच टीच जमातींनीं भरलेला राष्ट्रपुरुष आत्महत्येच्या पंथास लागला. पायाजवळ पाहून प्रत्येक जात शाबूत ठेवण्याच्या भरांत सर्व समाजाची मजबुती अंतरली, व अखेर सर्वांना सर्वांचें एकादल साह्याचें नेट न पोंचून सर्वच संघ मोडकळीला आले, आणि समाजाच्या हितानहितावर नजर पुराविण्याइतकी दीर्घदृष्टेि व समाजाला सर्व बाजूंनीं सांवरून धरण्याचा अांवाका केोणा एकाही समाजविभागांत उरला नाही. वतनपद्धति ही जातिधर्मीच्या अपार कुंडाचा गांवापुरता एक लहानसा हौद आहे. तिनें जसें वतनदारांना व्यक्तिशः व समुच्चयानें तुटक, स्वार्थी, व कमजोर करून एकंदर गावगाड्याचा विचका केला, तीच गति जातिधर्मानें एकंदर हिंदुसमाजाची केली. जें आडांत तेंच पोह-यांत येणार. जे धंदे ज्या जातीच्या हातीं पडले ते तिच्या बाहेर जाऊँ नयेत, ह्या धीरणानें जातधेद धर्माच्या पदवीस चढावले. धदेवाल्या जातींतील व्यक्तींचा लाभ वाढून त्यांना असें वाटू लागलें कीं, कांहीं प्रदेशापुरता कां होईना जातष्धंदा आपल्या विवक्षित कुळांच्या बाहर जाऊँ देऊँ नये. त्यांच्या ह्या आपमतलबी धोरणानें वतन निर्माण केलें. वतनांत राजाधिकाराचा अंश प्रमुख व जातिधमात धर्माधिकाराचा अंश प्रमुख असतो; तथापि दोघांनाही समाजाचें पाठबळ लागतें व होतेंही. ज्या कारणांनीं वतनी धंदे खालावले आणि अव्वल वतनदारांच्या हातून गेले, त्याच कारणांनीं अव्वलच्या जातथंद्यांची तटबंदी ढासळली.जात-धंदा आणि वतन ह्या संस्था लेोकसंग्रहाच्या आटोपसर बाल्यावस्थेमध्यें समाजस्थिति कशीबशी सांवरून धरण्याला कितीही उपकारक असल्या तरी त्या