२३० गांव-गाडा. तेव्हां असा प्रश्न उद्भवतो कीं, आधीं कोण? हीं दैवतें कां मुजावर? मुर्दाडमांस न खाण्याचें कारण मलीक (पर) तसें करूं देत नाहीं असें मांसाहारी हिंदू सांगतात; आणि पीर क्षोभतो म्हणून मुलान्याकडून जनावर हलाल न करवितां स्वतःच तें मारून खाणा-या फांसपारध्यांसारख्या जातींना इतर लोक पांढरींत राहूं देत नाहींत. हलक्या जातींच्या बहुवगैरे पंच पिरांना मानभाव कुलस्वामी समजतात. गॉर्वी फकीर नसला तर हिंदू वर्गणीनें परगांवचा फकीर आणून ताबूत करतात, व मोहरमांत फकीर होतात. ताबुतांला नवस करून त्यांच्याखालीं पोरांचें नाक कान द्वंद्रणारे हिंदू वरिष्ठ जातींत सुद्धां आहेत. अशा वेळी सोनारांची नाहक पोळी पिकते. पिराला किंवादग्र्याला लोटांगण घालतांना मुसलमान दृष्टीस पडत नाही; परंतु दुखण्यांतून उठले म्हणजे हिंदू लांबवर पिराला दंडवत घेत जातात; व लग्रकार्य झालें म्हणजे ब्राह्मणांबरोबर फकिरांना दक्षिण शिधा देतात, आणि पिराला ओहर-यात्रा करतात. (दपत्र्ये वृजत गाजत जाऊन नैवेद्य करतात.) सर्व जाती पिराला मलिंद (नैवेद्य) नेतात, व मुजावराचा त्यावर फात्या घेतात. कांहीं - ठिकाणी ब्राह्मण कुटुंबे सुद्धां दावलमालकाला हांजल निघून काळे फ फिरावतात. ताबूत आणि पिरांचे नवस ह्या प्रसंगों सर्व जातींचे हिंदू कीर जेवू घालतात. हिंदु लोक देवाला नवसानें गाई, पोळ सोडतात; आणि त्यांनीं शेतांत किंवा बाजारांत कशांतही तोंड घातलें तरी त्यांना कोणी वारीत नाहीं. बकरीं पिकांना फार अपाय करतात, त्याच्या तोंडेचा ठेोम म्हणून फुटत नाहीं. पिराच्या देव्हा-याला हिढूंनीं डोकें लवविल्यापासून पोळांच्या जोडीला पिराचे बोकड मिळाले, आणि दोघेही बाजारांत व शिवारांत धुमाकूळ घालतात. वांद्याच्या ख्रिस्तमातेलाविस्ती लोक बहुधा नृवस करीत नसावेत, परंतु हिंदूचे फुटतात. सारांश, सर्व व्यवहारांत एकमेकांतून बहुतांशीं फुटून निघा
पान:अस्पृश्य -विचार.pdf/251
Appearance