Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ఇఇ? गांव-गाडा. नसल्यामुळे व मुलांना परगांवीं ठेवण्याची ऐपत फार थोड्या वतनदार पाटीलकुळकण्यांना असल्यामुळे त्यांमध्यें अज्ञान फार असतें, आणि तें सर्व गांवाला नडतें. निरक्षर पाटीलू अनेक प्रसंगीं परबुद्धीनें चालून आपल्यांला व आपल्या निरक्षर बंधूंना खोड्यांत टाकतात. तेव्हां पाटीलकुळकर्णी आपल्यामुलाबाळांच्या प्रदरांत वतनाची दौलत म्हणून दारिद्य, अज्ञान व दुर्गुण ह्यांखेरीज दुसरी कोणती टाकणार आहेत? उद्योग न करतांव चोरीचपार्टीनें कुणब्याचा मालघरांत घालून संसार करण्यांत भिल्ल,कोळी,रामोशी, महार, मांग वगेरे निकृष्ट जातीच्या हलके गांवनोकराना आज बरें वाटतें. पण ही स्थिति किती दिवस टिकेल? सर्व जग कांहीं आतां डोळे मिटून बसलेंनाहीं. चोरी-चपाटीनें, आळसानें किंवा लेोचटपणानें प्रपंच चालवावा अशा भावननें त्यांच्या सबंध समाजाला घेरणें ही मोठी नैतिक हान आहे.उद्योग न करतां प्रपंच चालतो म्हणून ते आपल्या मुलांना शाळेत घालीत नाहीत, व हुन्नर शिकवीत नाहीत,हें अत्यंत शोचनीय आहे; आणि यांत ते भावी पिढीचें मोठं नुकसान करीत आहेत. बाजेवतनदारांचीही हीच स्थिति. कामापेक्षां व अकलेपेक्षां जास्त नफा पुष्कळांना मिळतो, यामुळे जास्त उद्योग करावा व ज्ञान संपादन करावें अशी ईर्षा ते धरीत नाहीत. वडिलांनीं पोट भरलें तसें आपणही गांवावर पोट भरूंअशी त्यांची खातरजमा असते, आणि त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा सुद्धां ते फायदा घेत नाहींत. वास्तविक त्यांचीं कामें मोठ्या कसबांचीं आहेत. हों कसवें जगांत झपाट्यानें वाढत आहेत, आणि परकी लोकांच्या त्यांवर उड्या पडत आहेत. सुतार, लोहार, चभिार, न्हावी, परीट वगेरे जीं हत्यारें आजकाल वापरतात त्यांकडे पाहिलें म्हणजे असें दिसून येतें कीं, सर्वांजवळ परदेशी हत्यारांचा भरणा झाला आहे. तीं सर्व आपल्या देशांत, नव्हे, गांवोगांव होत होती. पण करूनारूंच्या अज्ञानामुळे व निरुद्योगामुळे