Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परसग, २२१ सुतार, लोहार, चांभार ह्यांच्यासंबंधानें असंते. पैसा अगर धान्य देऊन आपले पसंतीच्या कारूनारूकडून काम घेण्याची असाम्यांना मुभा न ठेवल्यामुळे कारूनारू कसबांत कमी पडू लागले व शिरजोरही झाले. वतनपद्धतीमुळे एक आत मोठा समाजविघातक अवगुण आमच्यांत शिरला; तिनें सर्वांला अरेरावी, भिक्षुकी आणि चोर चाळे शिकविले. तिचा अंमल जारी असता तर आगगाडीचीं तिकिटें वर्षानुवर्ष खपलीं नसतीं, आणि वतनदार व त्यांचा माल फुकट न्यावा लागता; आणि इंग्रज सरकार ज्याप्रमाणें दुष्काळांत चा-याच्या वाहतुकीबद्दल भाडें भरपे करतें तसें कांहीं एक लाभलें नसतें. घोडे, गाडी पाहिजे असली कीं, ज्याजवळ गांवांत असेल त्याला त्याचे ग्रामबंधुतगादा लावतात.तुळशी, फुलें, केळीचीं पानें हवीं असलीं कीं, ज्याजवळ तीं असतील त्याकडे मागतात, व त्यांनीं दिलीं नाहींत म्हणजे रागावतात आणि वड्याचें तेल वांग्यावर काढतात. मागणें नको आणि रागावणें नको म्हणून कांहीं लोक हौसेच्या जिनसा जवळ बाळगीत नाहींत किंवा नामांकित उदीम करीत नाहींत. लोणकढे तुष्पापर्यंत वाणगी मिळावी अशी इच्छासार्वत्रिक असते. खेड्यांतले श्रीमंत सुद्धां विचारतात कीं, तुमच्याकडे आंबे, शेंगा, कोबी झाली पृण आमच्याक्डे वानवळा आला नाहीं. एकटे दुकटे कुणबी किफायतशोर पीक करीत नाहींत तें एवढयासाठीं कीं, एकठ्यानें केलें म्हणजे तें १ एका कुळकर्णी वतनदार मामलेदारांनीं आपल्या घराचें सुतारकाम गांवच्या सुताराला दिलें. त्यानें सागवान गैरहिशेबीं कापलें, तेव्हां कळून आलें कीं द्वा रद्वी कारागीर आहे. म्हणून त्याला रजा देऊन दुसरा सुतार पाहूं। लागले. तों बारा कोसांत कोणीही काम घेण्याला धजेना ! तालुक्याच्या ठाण्यांत देखील एका परटाकडे धुणें जाऊँ लागलें आणि नंतर त्यानें कपड़े फांडले, चोरले, अगर त्यापेक्षां दुसरा काम चांगलें करतो असें कळून आलें तरी पहिल्याला काढून दुस-याला लावतां येत नाहीं, व दुसराही अदावतीच्या भीतीनें पहिल्याचें काम धरीत नाहीं !! ह्या अनुभव पुष्कळ उप-या नोकरांना असेल,