Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पसत्त. २१९ उलट सरसकट हिशेब जुळविला तर आधकच पडतें अशी खात्री होईल. पण मोबदला मात्र कारूनारूंकडून अगदीं खोटा व महागाचा मिळतो. त्यांना सध्यां जी प्राप्ति होते ती त्यांच्या अकलेच्या, उद्योगाच्या मानानें वरीच आधक आहे. ह्याला प्रत्यंतर, हक्र सोडून रोखॉंने काम करण्याला एकही वतनदार कबूल नाहीं. लोहार, सुतार, चांभर, न्हावी वगेरे बलुतें सोडण्याला नाकबूल आहेत. त्याचप्रमाणें पाटीलकुलकर्णी (दुष्माला गांवचे) व महार जागले. दुष्काळापासून कुणबी खरकला तो सांवरत नाहीं. कारूनारूची - स्थिति कुणब्यापेक्षां पुष्कळ बरी आहे, इतकेंच नव्हे तर त्यांपैकीं कित्येकजण सावकारी करून आहेत. सावकारांना विचारतां पाटीलकुळकर्याशिवाय कारूनारू काचित् कर्जबाजारी आहेत असें समजतें. दुष्काळांत सुद्धां कुणब्याइतकी त्यांची गाळण झाली नाहीं. दिसतांना आपल्याला , महारांची इतकी केविलवाणी स्थिति दिसतेना ? पण एकंदरींत कुणब्यापेक्षांते पुष्कळ हात राखून आहेत. सन १९०५-०६, १९११-१२ सालच्या दुष्काळांत सरकारी जंगलांतलें गवत कापण्याला माणूस मिळेना; व महारमांग कांहीं केल्या गांव सोडून तिकडे जाईनात. पूर्वी एंजिनियर खात्याकडे / महारमांग कामक-यांची गर्दी असे. आतां त्या खात्याच्या कारकुनांना गांठचा विसार देऊन महारवाडयांत जेडे फाडावे लागतात तरी पुरेसे रोजंदार मिळत नाहींत. जनावरांच्या हाडकाकातड्याला किंमत आल्यापासून महार' गांवोगांव सुधारलेले दिसतात. ढोरामार्गे हाडकेंचरबी व कातडे ह्यांचे सरा- ' सरी वीस पंचवीस रुपये येतात. तरी त्यांना वास्तविक मिळावा तितका नफा मिळत नाही; कारण हाडकें, कातडीं,तरवडाची साल ह्यांचापेठेचा बाजारभाव त्यांना माहीत नसतो. ज्याप्रमाणें रस पिणारा पिऊन जाती आणि चरकाचें तोंड देखील पुरतें माखत नाहीं, त्याप्रमाणें त्यांची गत झाली आहे. १. पनवेलच्या मद्वारांनीं अजमासें १०० रुपये सालाप्रमाणें हृाडकाकातड्यांचा दृक मिस्तर याकुवभाई नांवाच्या गृष्ट्रस्थास दिला आहे. महार वर्षानुवर्ष त्यांस द्वाडकें कातडीं देतात, आणि भाईसाहेब लक्षाधीश झाले आहेत असें ऐकतों!