R饭2 गांव-गाडा. आले आहेत. सुधारणा घडून येण्यास व्यक्तिवैचित्र्यास पूर्ण वाव पाहिजे. तो संप्रदाय-प्रधान वतनी पद्धतींत कसा मिळावा ? वडिलांनीं जें हत्यार पांच बोटांनीं धरलें तें जर कोणी तीन बोटांनीं धरूं लागला तर बाकीचे त्याचा उपहास करतील, इतकेंच नव्हे तर त्याला पाण्यांत पाहून वेळेला जातीबाहेर टाकतील, अशी वतनी कसब्यांची स्थिति आहे. मातकामाला वडुरांचीं हत्यारें चांगलीं. असें सर्वजण पाहतात. परंतु इतर जातींचे लोक मातकाम परंपरेच्या निकामी हत्यारांनीं करतात. सरण डोक्यावरच महारांनीं वाहिलें पाहिजे, अशी रूढि आहे. तेंच दुस-या जातींच्या गरीब मजुरांनीं किंवा गाडीत घालून नेलें तर वाहतूक कमी पडेल. पण तसें करतां येत नाहीं. दोन शिंवांशेजारच्या गांवांत आणि घराशेजारच्या घरांत भिन्न रूढि दिसते, आणि ती पिढयानुपिढ्या पाळावी लागते. तिच्याविरुद्ध चालतां कामा नये. जातिधर्मानें हिंदी समाजाला रूढीचे गुलाम केलें व वतनपद्धतीनें हा दोष जुलूम वाढविला. सर्कस व जादूगिरीचें उदाहरण घेऊं, गोपाळ, कोल्हाटी, ह्या कसरती जाती, वाघ ह्यांशिवाय मराठे, मुसलमान, चाबुकस्वारीचें काम करतात. विचार करा कीं, व्यक्तिवैचित्र्याला पूर्ण मुभा असती, तर युरोपियन सर्कसचीं सर्व कामें करण्यास ह्यांना कितीसे अधिक श्रम करावे लागले असते ? पण ती नसल्यामुळे युरोपियन व एतद्देशष्य सर्कसवाले खोज्यांनीं पैसे ओढतात, ভ্ৰাজি हे गांवोंगांव खळीं मागत व चोरीत हिंडतात. अॅमच्या घरांतला
पान:अस्पृश्य -विचार.pdf/235
Appearance