कुणबी. १९३ तिच्यांत ती गुंतविली तर तिच्यावरचें व्याज पदरांत पडून वेळीं अवेळीं स्वतःलाही हलक्या व्याजानें कर्ज काढतां येईल. अमुक रकमेपर्यंत एकंदर कर्ज द्यावयाचें असा ठराव पास करून विलायतेंत स्कॉर्बी अॅग्रेिकलचरल क्रेडिट सोसायटीनें ज्याप्रमाणें आपली जोस्वीम नियमित केली, त्याप्रमाणें इकडील सहकारी मंडळ्यांनाही करतां येईल; आणि । अनियमित जबाबदारीचा जो कित्येकांना बागुलबुआ वाटती तो नाहीसा होईल. तेव्हां एक अगर एकाहून अधिक गांवच्या अबूदार, सत्यवादी, निग्रही ह्मणजे वायदा टळू न देणारे आणि हें माझें हें लोकांचें अशी प्रतारणा नसणारे शेतकरी, कारागीर अगर मजूर ह्यांनीं एकचित व्हावें, आपले शक्यनुसार भांडवल जमवावें आणि सहकारी मंडळी स्थापन करावी. प्रवेश-फी, देणग्या, ठेवी, व दुस-या सहकारी मंडळ्या व पेढ्यांकडून कर्ज इत्यादि साधनांनीं सहकारी मंडळ्यांना भांडवल गोळा करतां येतें. पतपेढी स्थापन करण्यासंबंधाचे सर्वसाधारण नियम सरकारनें प्रसिद्ध केले आहेत. त्याबद्दलची माहिती तालुक्याचे मामलेदार सांगतील. शिवाय या कामांत सलुामसलत देणारे गृहस्थ अनेक जिल्ह्यांत आहेत, तेही योग्य ती मदत देतील. प्रथम छापलेले नियम मागवावेत, मग लहानशी सभा भरवून त्यांत त्यांची चर्चा करावी व पेढीचा व्यवहार कशा रीतीनें चालवावयाचा हें मुकर करावें, आणि बहुमतानुरोधानें स्थानिक स्थितीला योग्य ते फेरफार करून त्यांवर बारा इसमांनीं सह्या करून मे. राजट्रारसाहेब कोआपरेटिव्ह सोसायटी, पुणें, यांजकडे सदर सहकारी मंडळी नोंदविण्याबद्दल अर्ज करावा. मंडळी नोंदल्यानंतर अर्जेदारांनै व त्यांखेरीज मंडळींत येऊं इच्छिणा-या लायक गृहस्थांनीं सभा भरवावी, आणि तिच्यांतून व्यवस्थापक मंडळी, अध्यक्ष, कागदपत्र व हिशेब ठेविण्यासाठीं एक सेक्रेटरी व त्याचा पगार वगैरेसंबंधानें ठराव करून कामास सुरुवात करावी. मंडळीची शिलुक पोस्टाचे सेव्हिंग व्यांकेंत राहते. किरकोळ खर्चासाठीं ह्मणून सक्रेटरीजवळ १० रुपये ዓ 3
पान:अस्पृश्य -विचार.pdf/214
Appearance