कुणबी. RడS काम सरकार करील तितकें थोडेंच आहे. इलाखानिहाय शेतकीचीं कॉलेजें आहेत. त्यांत शिकून तयार झालेल्या लोकांना सरकार शेतीखात्यांत घेतें, आणि त्यांच्याद्वारें कुणबिकीच्या ज्ञानाचा प्रसार करतें. मुंबई इलाख्याचें शेतकी कॉलेज पुणें येथें आहे. तेथेंही शेतकीसंबंधानें प्रयोग व शोध चालू असून त्यांच्या माहितीचा प्रसार करण्याचें काम चाललें आहे. सदर कॉलेजामध्यें थोड्या दिवसांत संपणा-या अभ्यासक्रमाचे वर्ग आहेत, आणि देशी भाषांतून उंसाची लागवड शिकविण्याचा वर्ग आहे. लोणी काळभर, जांभूळ (ठाणें), देवीहोसूर (धारवाड), गोधा व मिरपुरखास (सिंध) येथें देशी भाषांत कृषिविद्या शिकविणा-या शाळा स्थापन झाल्यासारख्या आहेत. श्री० सरदार विवलकर ह्यांनीं अलीबागेस स्वतःच्या खर्चानें शेतकी शाळा चालविली आहे, आणि तिचा लोकांना पुष्कळ उपयोग होत आहे. शेतकी शाळा स्थापन करण्यासाठीं चोपडें तालुक्याच्या लोकांनीं वर्गणी जमविली आहे. सरकारानें अलीबाग, रत्नागिरी, धुळे, जळगांव, अहमदनगर, पुणें, मांजरी, नाडियाद, सुरत, दोहद, धारवाड, गोकाक, गदग वगेरे ठिकाणीं नमुन्याचीं शेतें स्थापिलीं आहेत. जनावरांच्या जोपासनेचा व त्यांची पैदास सुधारण्याचा बोध होण्यासाठींसरकारनेंदवणी घातल्या आहेत; त्यांत मुख्य गजरातेंतील नार्थकोट गोशाळा होय. सबंध इलाख्यांत शेतकी प्रयोगांचीं ठाणीं वीस असून पोटठाणीं एकोणीस आहेत. ह्या सर्व ठिकाणीं जे शोध उपयुक्त ठरतात त्यांचें ज्ञान शेतक-याला मिळावें म्हणून सरकार देशी भाषेत पुस्तकें पत्रकें प्रसिद्ध करून गांवोगांव वांटीत आहे. त्यांमध्यें जमिनींची व वियांची निवड, कोणतों नवीन पिकें कोटें काढ़तां येतील, कोणतीं नवीन आउर्ते (जसें वाफेचा नांगर) इकडे उपयोगांत आणितां येतील, धान्य आणि जनावरांचे रोग व त्यांवरील उपाय,उत्तम खतें, उदीमांवरील कोड घालविण्याचे उपाय, दुभत्याच्या जनावरांची जोपासना, मलई. काढण्याचें यंत्र वगैरेंबद्दल माहिती असते. ह्या सर्वांचें सप्रयोग ज्ञान देण्यासाठीं ठिकठिकाणीं प्रत्याक्षर्क व प्रदर्शनेंही भरविण्यांत येतात.
पान:अस्पृश्य -विचार.pdf/208
Appearance