कुणबी. १८५ अशी जी अनेक ठिकाणीं पिकाची नासाडी होते ती टळेल. ह्या प्रकारचे हत्याराचे परवाने देण्याचा आधकार प्रांत मॅजिस्ट्रेटला दिला तर रयतेची सोय पुष्कळ वाढेल. हत्यारांच्या खालोखाल शेतक-यांची दुसरी तक्रार कुणबी कण्हतात. निवडुंगाचें कुंपण करावें तर त्याचा कांटा विषारी असून त्याखालीं विंचू, साप राहतात, त्याला आग फार असते व त्याच्या वसव्यामुळे ५१० हात जमिनींत पीक येत नाहीं. शेराचें कुंपण करावें तर त्याला आग असून त्याला जनावर खेटलें म्हणजे अपाय होतो. एका शेताभेोंवतीं ॥१०॥१२ हात रुंद व ६७ हात खोल असा खंदक रानडुकरांसाठीं केलेला दिसला. इतकी जमीन दरसाल अडविणें फायदेशीर नसलें पाहिजे. जें झाड एका ठिकाणीं उगवर्त तें तेथून बारा कोसांवर उगवेल कीं नाहीं हैं सांगतां येत नाहीं. तेव्हां बोरी, बो-हाटी, हेकळ, करवंदी, खैर, करंजी वगैरे झाडाझुडपांचें कुंपण करणें झाल्यास अल्पखर्चानें फार जागा न अडवितां आणि वसवा न पाडतां कोणतें कुंपण घालतां येईल ह्या प्रक्षाचें' सर्वसाधारण उत्तर देतां येणार नाही. सबब हा प्रश्न शेतकीसभेनें हातीं घ्यावा, आणि वाकबगार शेतक-यां- कडून त्याची शहानिशा करवून फायदेशीर कुंपणें ठरवावीत. कुंपण नसल्यानें माणसें जाणून बुजून शेतमालाची चोरी करतात, व गवत किंवा धान्य उगवलें कीं रस्त्यानें जाणारी येणारी जनावरें शैतांत तोंड घालतात. असल्या जनावरांमध्यें देवा-पिरांला वाहिलेली जनावरें अति उपद्रव देतात. खेड्यांत मोकार जनावरें सोडण्याची सरांस चाल आहे, ती अजिबात बंद झाली पाहिजे. पहातां पहातां ओघानें आले म्हणून येर्थ हैंही सांगितलें पाहिजे कीं, हलक्या जातींचे वतनदार व फिरते नुसते शेतमाल व जनावरांवरच ताव मारून राहतात असें नाहीं तर ते कुणबिकीचे अनेक पीटर्धदे कुणब्याला किफायतशीर होऊँ देत नाहींत. इंग्लंडमध्यें निम्मी जमीन चारण राखतात, व आपल्याकडे .शेंकडा सतरा जमीन सुद्ध चारा-पेरीला ठेवीत नाहींत. सुमारें पावहिस्सा
पान:अस्पृश्य -विचार.pdf/206
Appearance