१८२ गांव-गाडा. व्यापारी पोंच बिलकूल धरीत नाहीं. इमानेंइतबारें काम करून आपणही खावें, आणि शेतधन्याचा अंश बिनबोभाट न मागतां त्याला पोहोंचवावा अशी दानत फार थोड्या कुणब्यांची असते. * असेल मालक शेतीं तर शेती, नाहीं तर माती ? असें म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे कीं, कुणब्यावर जर खंबीर राखण ठेवलें नाहीं तर शेतचें कांहींएक हातीं लागावयाचें नाहीं. कुणबी शेतांत काय करतो, काय चोरतो, वेळेवर पाळी घालतो किंवा नाहीं, मोट धरतो किंवा नाहीं, राखण करितो किंवा नाहीं, सारांश पत्करलेलें काम करती किंवा नाहीं, यासाठीं मालकाला नेहमीं त्याच्या पायावर पाय देऊन उभे रहावें लागतें, आणि रात्रींच्या रात्रीं खळ्यांत पडावें लागतें. हीच अवस्था सर्व प्रकारच्या मजुरीबद्दल आहे. खुरपणी-वैचणीला जे मजूर लावावेत ते चापून मजुरी घेऊन शेतमाल घोळांत, पदरांत, भाकरीच्या पाठींत किंवा पिण्याच्या भांड्यांत चोरून आणतात. तो विकत घेण्यासाठीं मिठाई, खारीक, खोवरें, सुपारी, खजूर घेऊन भिकार दुकानदार हंगामाच्या दिवसांत संध्याकाळच्या सुमारास शेतवाटांवर बसलेले असतात. धन्याचे हे श्रम आणि नुकसान वांचविलें तर त्याचा मोबदला कोणीहीं आनंदानें देईल, आणि कुणब्याची राजरोष किफायत वाढेल. गिरणयांसारख्या कारखान्यांत बहुतेक मजूर कुणबी वर्गातले आहेत, ते तेथें काम कुचराईनें करतात. यूरोप-अमेरिकेच्या मजरांच्या कामाचा पांचवा सहावा हिस्साही हिंदी मजुराचें काम पडत नाही अशी ओढ आहे. ती कां ? तिर्चे कारण इतकेंच कीं, कामचोरपणा हो गुण आमच्या सर्वांच्या अंगी खिळला आहे. यूरोपियन जमीनदार, खाणीवाले व कारखानदार ह्यान हिद मजुरांना सक्तीनें काम करण्याला भाग पाडण्याचे कायदे करून घेतले ते ह्या अवगुणांमुळे तर नसतीलन? अर्थात् ह्या कायद्यांची तरफदारी करण्याचा हेतु नाही; फक्त आमचे अवगुण आम्हांला करों नडतात हैं दाखविण्याचा आहे. कामकुचरपणा व लबाडी ह्यांच्या मागोमाग येणारा दुर्गुण म्हणजे एकमेकांचा पहिल्याने अपहार, नंतर
पान:अस्पृश्य -विचार.pdf/201
Appearance