१७६ गांव-गाडा. जंगलबंदीमुळे असाम्यांना महार सरपण पुरविण्यास व मांग केरसुण्या, दोरखंड पुरविण्यास असमर्थ झाले आहेत. सुताराला व लोहाराला काम V होऊन उरलेलें सरपण ठेवू देणें नुकसानीचें झालें आहे. धान्याचे, इत ल्यामुळे आणि तोच प्रधान धंदा असल्यामुळे बळीराजा सर्वांचा पोशिंदा जो एकदां कधीं काळीं ठरला तो आतां ज्येष्ठ-आषाढांतील बैलाप्रमाणें उठवणी आला आहे तरी त्याची झटेंकमी होत नाहींत. कुणबी व कारू नारू ह्यांजवळ तपास करतां असें समजतें कीं बलुतें, आणि आलुतें मिळून राशीचा शेंकडा २२ तें २५ मुख्य धान्य जातें. याखेरीज किरकोळ धान्य, भाजीपाला, गवत, काडी, सणवार, शिधा, वाढणीं, पंक्तीचा ठाव वगैरे. कुणब्याचा हात नेहमीं वर असतो, असें म्हणतात. ही माहिती मिळवितांना बहुतेक कुणबी ती देण्याचें नाकारीत आणि दिलदारपणानें म्हणत कीं, ‘आपल्या हातानें दिलें मग त्याचा उच्चार कशाला पाहिजे !' यावरून असें वाटतें कीं, ते देतात त्यापेक्षां कमी सांगतात. कारूनारू तर खात्रीनें कमी सांगावयाचे. अशी ही दुहेरी छपवाछपव ध्यानांत आणली म्हणजे असा अदाज बांधण्यास हरकत नाहीं की, आलुक्येबलुत्ये व भिकार कुणब्याचे देखत किंवा हातून त्याच्या उत्प त्राचा कमकसूर तिसरा हिस्सा घेऊन जात असावें, व चोरट्यांची तस्करगिरीची कमाई ह्या खेरीज असावी. ह्या राज्यापूर्वी मिरासदार उप-यांची स्थिति कशी हेोती, तिच्यांत काय फेरबदल झाला आहे, उदमी हळकरी कुणब्याला कसे लुबाडतात, त्याला आपला माल बाजारांत कां विकतां येत नाही, इत्यादींचें वर्णन पूर्वी आलेंच आहे. ह्या ठोकरींचा व त्यामुळे मार्गे लागलेल्या भगभगीचा परिणाम त्याच्या सांपत्तिक स्थितीवरच नव्हे तर देहस्वभावावरही झाला
पान:अस्पृश्य -विचार.pdf/197
Appearance