Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणबी. چاچا ؟ अलुप्तदार-बलुप्तदार नुसतें कुणब्यांचेंच काम करितात असें नाहीं, तर ते सर्व नारभाऊ-कारभावांचें जातिविशिष्ट काम फुकट म्हणजे पैसा। अगर धान्य न घेतां करतात. तसेच गांवची जबाबदारी वतनदारांत समाईक असल्यामुळे गांवांत कायम वस्तीला किंवा थोडा वेळ मुकामाला आलेल्यांचीं कामेंही त्यांना फुकट करावीं लागत व लागतात. जमीन अगर वतनी काम नसलेल्या मुसलमान रहिवाशाची व अतिथि-अभ्यागतांचीं कामें लोहार,सुतार, परीट,न्हावी,चांभार, आजमितीला सुद्धां फुकट करतात. पूर्वीच्या अमदानींत परगणेवतनदारांचे व ग्रामाधिका-यांचे कारूनारूंवर हक असत, आणि सरकारी कामगारांचीही त्यांना पुष्कळ वर्दळ लागे. तेव्हां कुणबी, कारूनारू, पै-पाहुणा आणि हकदार ह्या सर्वांचीं करार्वीं लागणारीं खासगी व गांवकीचीं कामें व द्यावे लागणारे हक हें सर्व जर्मेत धरून आलुप्त्याबलुत्याचा निरख ठरला; आणि सगळे अडाणी मोकळे राहून समस्तांच्या योगक्षेमासाठीं तो एकट्या कुणब्यानें पुरा पाडण्याचा जो एकदां भार उचलला तो अद्यापि बिचारा वाहत आहे. पृथ्वी व समुद्र मोकळा आणि जंगल मिठाची सवलत, काळी मुबलक व नवट आणि कुणबी थोडा, अशावेळीं हा धारा पडला. धारण स्वस्ती आणि सर्वांना पोटभर खाण्याइतका गांवोगांव दाणा शिष्छक असे, म्हणून आजपर्यंत कोणीही बलुत्येआलुत्ये व त्यांचीं कामें ह्यांचा हिशेब चुकून केला नाहीं. तशांत कुणबी मायाळू आणि भिडस्त व इतर सर्व काढू पडले. ह्या व आतां कारूनारूंच्या डोक्यावरील जमेदारी हकगेले;सरकारच्या सर्व खात्यांत सुधारणा होऊन त्यांचीं कामें हलकीं झाली, व कित्येक कामें आजिबात वजा पडली. रयतवारी पद्धतीमुळे खातेदार किंवा कबजेदार कुणबी कारूनारूंच्या गांवकी कामाबद्दल सरकारला किंवा गांवाला जबाबदार नाहीं. व्यापारवृद्धीमुळे बरींच हत्यारें व जिनसा आयत्या मिळतात, किंवा कारूंच्या अडाणीपणामुळे विकत घ्याव्या लागतात. दाम सुकाळामुळे एनामेल, तांबें, पितळ, वगैरेंचीं भांडीं जास्त प्रचारांत आलीं आहेत.