3년 गांव-गाड. देऊन झाडें लावण्यास उतेजन देत आहे. चा-याचा संचय कसा करावा हैं कोडें उकलण्यांत सरकार व लोक गुंतले आहत. परंतु जोंपर्यंत कुणब्याच्या मागचे हे मुंगे तोडून काढले नाहीत, तोपर्यंत सरकारच्या व लोकांच्या प्रयत्नाला ह्या कामीं यश येणार नाहीं. यावें कसें ? जमिनीच्या बाहर अंकुर येण्याचा उशीर कीं तो खुडलाच. मना करावें तर जाळ सुडी, मार जनावर असल्या नुकसानीला पाचारण करावें. जेोंपर्यंत अशी स्थिति आहे तोंपर्यंत कुणब्यानें तरी काय करावें ? आणि चा-याचा व जनावरांचा संग्रह कसा करावा व त्यांचा विमा उतरण्याला तरी कोणीं पुढें यावें ? आतां काळी आंखली आहे, आणि वाटेल तेथें रान काढण्याला कुणब्याला मार्ग नाहीं. वांटणीमुळे शेताच्या चिंधेोट्या चिंधोट्या झालेल्या आहेत. तेव्हां सबंध दुनियेच्या पेोषणाचें ओझें कुणब्याला त्रैपेनासें झालें आहे. आणि “ एक बळी हजार छळी ” असें तो पाण्याच्या दर घोटास कुरकुरतो. पाटील-कुळकण्यांचे ऐन जिनसी हक वजा केले. तसे महारजागल्यांचे सरकारनें केले नाहीत. त्यामुळे कुणब्यांना सबंध महारवाडा, रामोसवाडा, भिलाटी कोळवण, मांगवण पेोसावं लागतें. आम्ही सरकारचें काम करितों असें, म्हणून कुणब्याच्या बोकांडीं बसून हे लेोक त्याला लोळवितात. तसेंच दुरसाल हजारों भिकार सहपरिवार कुणब्याला पोसावें लागतें. समुद्र, जंगल सुटें होतें, हत्यारांची मनाई नव्हती, तेव्हां हे लोक व भटक्ये जंगलावर, शिकारीवर व मिठावर थोडें फार पेोष्ट काढीत आणि पिकांना व ढोरांना उपद्रव करणा-या पांस्वराजनावरांचा संहार करीत. जंगलकाळी आंखून कुणब्याला डांभलें त्याच वेळेला ह्या सर्वांना डांभून टाकावयास पाहिजे होतें. तसें न झाल्यानें कुणब्याच्या आयातील मात्र बांध पड्ला; परंतु निर्गत कायम-नूव्हे-जास्त वाढली. कुणबी म्हणत असतो कीं, पृथ्वीचा एक कोंपरा पिकला आणि तीन स्काण राहिले म्ह्णजे सृगव्या भोरड्यू पिकलेल्या भागावर आदळतात. तशी त्याची गति झाली आहे, आणि माणसांजनावरांचीं सर्व खातीं-तोंडे शेतांवर येऊन पडलीं आहेत. y
पान:अस्पृश्य -विचार.pdf/195
Appearance