Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुणबी. 2\5Յ: परापडलोलुपांना फुकट तोडून आणिलेलें सरपण विकण्याचा एक रोजगार झाला. होतां होतां गोंव-यांचा उपयोग खताकडे करण्याच्याऐवजीं कुणबी त्या जाळू लागले, आणि सर्व जाती कुणब्यांचीं गुरें ण्याला जाऊं लागल्या. शेत कुपाटी व चा-याचीही हीच कथा. खेड्याच्या सरकारी बंगल्याच्या कंपॅौंडांतील झाडांचा व गवताचा, सरकारी जागेवरील तरवडाचा व शेण्यांचा देखील लिलांव होतो. पण कुणब्याच्या तरवडकेकताडावर महारमांग ताव मारतात, व त्याच्या शेतांत झुड्रप दिसलें किंवा गवताचा ठोम उगवला कीं महारपेार व भिकार तें नेतें. वास्तविकपणें गायरानें, गांवचारण, शेताच्या बाजूच्या । । रस्त्याच्या कडा ह्यांवर कुणब्याचा अग्र हक; परंतु गांवचे सर्व अडाणी व भटकणारे लोक आपलीं जनावरें मोकार सोडतात, आणि कुणब्यांच्या जनावरांच्या वांट्याला तेथील गवत येऊं देत नाहीत. पट्टी भरतो कुणबी आणि वरिष्ठ जाती शिवाय करून सर्व बलुत्येआलुत्ये व भटक्ये त्याच्या शेतांतलें गवत-बाष्ट्रक काढतात, रात्रीं चोरतात, आणि त्यावर आपलीं गुरें पोसतात किंवा त्याचे टके करितात. गाढवा-. डुकरांना कधीं दर्वे नसतें, व त्यांना उचलून चारा कोणी टाकीत नाही. त्यामुळे परीट, कुंभार, पाथरट्, वैदु वगैरेंचीं गाढवें आणि वडार, कोल्हाटी यांचीं डुकरें ह्यांची शेतांना नेहमीं वर्दळ लागते. तेव्हां आज स्थिति अशी आहे की, कुणबी ओरडतो माझे बैल उपाशीं मरतात, १०-२० रुपये शेंकड्याप्रमाणें मला कडबा विकत घ्यावा लागतो, दोन दोन कोस पायपीट केली तरी कु-हाडीच्या दांड्याजोगें सरळ किंवा हळसाजॉर्गे बांकदार लांकूड भेटत नाही; आणि बाकी सर्व दुनिया शेतांतील चारा, तरवड, केकताड, फांटी, फुकट म्हणून बेसुमार लुटते, नव्हे कनिष्ठ जाती त्याचे पैसे करतात, आणि इा कप झेोडतो कीं, चा-यासरपणाचा दुकाळ पडला. मुलकी खात्याचा ठराव नंबर ५ तारीख २-१-१९१३ अन्वयें मुंबईसरकार लोकांना सवलती