Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ गांव-गाड. तेव्हां स्वसंरक्षणार्थ त्यांच्यामध्यें अरब लोकांना शिपाईवेषानें चाकरीस ठेवण्याचा प्रघात पडला. त्यांचा पगार मोठा, आणि खर्च कंजूषपणाचा असल्यामुळे ते अल्पावधींत व्याजबद्वा करूं लागले. खानदेशांतील त्यांच्या व्यवहारासंबंधानें क्याप्टन ब्रिग्ज ह्यांचा रिपोर्ट मनन करण्यासारखा आहे. थाळनेर, बेटावद, सिंधखेड, सोनगीर, सुलतानपूर, आणि नंदुरबार ह्या परगण्यांत खेड्याखेड्यांनीं दोन अगर तीन अरबांचें ठाणें असे; आणि पुष्कळ दिवसांपूर्वी दिलेले कर्जाबद्दल ते दरमहा दरशैकडा ८॥१० टके व्याज घेत. दुबळ्या खेडवळांवर जुलूम करण्यांत आणि त्यांचेकडून सोनेंनाणें, जडजवाहीर जबरीनें काढण्यांत ते आपलें शेौर्य व शक्ति खर्ची घालीत. त्यांच्या पेंढारीपणास कंटाळून अखेर कंपनी सरकारनें त्या सर्वोला खानदेशांतून सुरतेस नेलें, आणि जहाजांत घालून अरबस्तानांत रवाना केलें. ही कुलकथा सांगण्याचें कारण इतकेंच कीं, शंभर वर्षांपूर्वी अरबांनीं ज्याप्रमाणें गांवढेक-यांना हैराण, केलें तसेंच आज पठाण व पंजाबी व्यापारी दक्षिणप्रांतीं करीत आहेत : पठाणांना रोहिले, काबुली, पेशावरी, खान, अफगाण, कंदाहारी, पशतुनी, पेशनी म्हणतात. ते आणि पंजाबी व्यापारी हे विशेषतः रोहिले, काबुली, भरेकरी किंवा दमकोंडे, ह्या नांवांनीं प्रसिद्ध आहेत. असाम्यांकडे हे लोक पैसे मागावयाला गेले, आणि त्यांनीं म्हटलें दम धर म्हणजे ते थोडा वेळ नाक दाबून धरतात; म्हणून दमकोंडे हें त्यांचें नांव पडलें. ते लालबुंद, सुरेख, पिळदार, सशक्त, सतेज, पट, उग्र व उंचे पुरे असतात. डांगाणांतले कोळी ठाकर म्हणतात कीं, ते साहेब लोकांचे कोणी तरी असावेत, आणि त्यांना सरकारचा हुकूम असावा; त्याशिवाय ते मारपीट करून देणें वसूल करतेना. असो. ते इकडील लोकांना कस्पटाप्रमाणें लेखतात, आणि लोकही त्यांच्या शीघ्रकोपी व कूर स्वभावाला आणि शरीरसामथ्र्याला भिऊन त्यांच्यापासून जरा लांबच राहतात. मराठी म्हण अशी आहे की, ' सावकाराचे उरावरून आणि सरकारचे पाठीमागून जावें. ? पण दमकोंड्याचे