Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ गोंच-गाडा. कुळे तितकें देत नाहींत, व तेही भांडणाचें तोंड काळे म्हणून माघार घेतात. दोन्ही वर्गीची संख्या इतकी अल्प आहे कीं ती जमेंत धरण्यासारखी नाहीं. कारण पुष्कळ दिवसांपासून दाक्षिणात्यांचा वैश्यवृत्ती विद्वान् व्हावें, राज्यकारभार हांकावा, जमेदार बनावें, स्थावर संपादावें, ह्या व ह्यांसारख्या उद्योगाची दक्षिणेंत अतोनात चहादारी झाली; आणि तागडी-माप हातीं धरावें व एकाचे दोन करावे, असल्या वाणिज्याला लोक तुच्छ मानू लागले. ब्राह्मण किंवा क्षात्रधर्मीना काय तो मान मिळू लागला; आणि वैश्यवृत्ति मानहीन झाली. हे दोन्ही रोजगार ताजे नव्हत. त्यांच्या उत्पन्नांचा झरा नसतो, पूर असतो. शेती, इनाम, वतनें, सालचाकरी वगैरेंचें उत्पन्न वर्षांतून एकदां हातीं चढावयाचें. म्हणून इकडे नेहमीं दाम दुष्काळ राहून, देणें घेणें व व्यापार परप्रांतियांचे हातीं गेला; परंतु जिन्नसांच्या विशेषतः शेतमालाच्या व गांवहुन्नराच्या किंमती स्वस्त्या रहात गेल्या व जनता द्रव्यहीन राहिली, तरी वतनाचा मान जागा, पानसुपारी अगोदर ब्राह्मणाला, साधूंना व वतनदारांना मिळते, मग ते दोन प्रहराला कां महाग असेनात; आणि त्यांच्या मागून शेटसावकारांना मान मिळतो. गांवपंचायतींत चांभार, महारांना बोलावलें नाहीं तर ते रुसतात. पण असला हक त्यांवर कर्ज असणा-या शेटजींना सांगतां येत नाही. असल्या सामाजिक कल्पनांमुळे आमच्या लोकांनीं पूर्वीपासून व्यापारांत मन घातलें नाहीं, व नाण्याचें प्राबल्य ओळखिलें नाही. तरी पण सराफी करणारे कांहीं ब्राह्मण नाईक होते; आणि सार्वकारी, दुकानदारी करणारीं थोडीं फार इतर जातींचीं घराणीं होती. ह्या लोकांच्या पिढ्यान्पिढ्या गांवांत झाल्यामुळे व त्यांना कमी अधीक वतनवाडी असल्यामुळे ते गांवच्या वतनदारांत मोडत, आणि कुळे शाबूत ठेवून त्यांना आपला धंदा करावा लागे. कुणब्याच्या भिडस्त