Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 ዒረ गाँव-गाडा. खोबरेल बायजाबाई पाटलिणीच्या अंगावर उतलें किंवा त्यायोगें तिच्या डोक्याचे केश पार झडले, अगर भिमसेन महाराला खराब घासलेटच्या धुरानें कफक्षय झाला, तर मुंबईच्या लक्षाधीश शेटचें किंवा युरोप-अमेरिकेच्या कोव्याधीश व्यापारी कंपनीचें काय जातें ? 'अर्थातुराणां न पिता न बंधु!” पैशासाठीं हपापलेल्या व्यापा-यांच्या तावडीतून खेड्यांतले लोक वाचविणें अत्यंत अवश्य झालें आहे. ते खेड्यांच्या लोकांच्या मार्थी जो खाण्यापिण्याचा लेण्यानेसण्याचा अपायकारक माल मारतात, त्याकडे पाहून असे उद्वार निघतात कीं, 'बाबांनो द्रव्यदंड घ्या पण देहदंड तरी घेऊं नका’. मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें अशी आपली जुनी वहिवाट होती. ती जर आमचे व्यापारी चालविते, आणि गि-हाइकाला टिकाऊ पथ्यकर माल पुरवून तें तगतें व धडधाकट ठेवणें, व पेठेला सचेोटीचें व परिणामीं हितकर वळण लावणें, ह्याची वैश्यवर्णावरील जबाबदारी जर ते ओळखते, तर खेड्यांचीं दुकानें म्हणजे शहरचे उकिरडे अशी स्थिति होती.ना. वजनामापांत, भावाटावांत, हिशोबांत खेड्यांतलें गि-हाईक सर्वस्र्वी दुकानदारांच्या मांडीवर मान टाकर्ते. तेव्हां व्यापाप्यांचा निर्धार झाला कीं खेोटा माल म्हणून आणावयाचा नाही,तर शेर अच्छेर मालासाठीं किंवा १०|२० हात कापडासाठी गि-हाईक मुंबई पाहून खोटा पण स्वस्ता माल घेऊन येईल, आणि त्यामुळे आपलें नुकसान होईल, अशी भीति बाळगण्याचें कारण नाहीं. माल खरा पण महाग मिळू लागूला म्हणजे फार तर गि-हाईक तो कमी घेईल, आणि मित होणार नाहीं. गि-हाईक मितव्ययी झालें तर व्यापा-यांचा कायमचा फायदा आहे. दुसरी गोष्ट अशी कीं, वाईट माल पैदा करणाच्या देशी परदेशी व्यापाच्यांची स्थिति कैफी माणसाप्रमाणें झाली आहे. जोंजों वाईट माल खपतो तों तों तो अधिक अधिक वाईट पण स्वस्ता कसा बनावतां येईल ह्या विचारांत ते चूर होऊन गेले आहेत, व उत्तरोत्तर जास्त जास्त