फिरस्ते. १३५१ नाहीं तर तें नपुंसक होतें आणि वंशखंड होती. जन्मचे जन्म जातात तरी मोठमोठ्या पंडितांला धर्माचा सुगावा लागत नाहीं, परंतु आमच्यांत ज्याप्रमाणें बाहुलाबाहुलींचीं लग्नें होतात तशी लोकांच्या अज्ञानाचा व धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन पाळण्यांत चिल्यापिल्यांना धर्मदीक्षा किंवा पंथदीक्षा देण्यांत येते. असे मुंडलेले लोक पुढें कुसंगतीनें दुराचारी होतात, आणि मुरळ्या, भाविणी ह्यांना तर पोटासाठी कसब करणें प्राप्त होतें. परंतु अप्रबुद्धपणीं गुरूचे चेल्यावर जुलूम वैजन असतें; व त्याला मायेंत घेण्यासाठी खाणें-पिणें, लेणें वगैरे हरएक बाबतींत चेल्याचे असे लाड चालतात, कीं कोणी पोटच्या पोराचें इतकें कोड पुरवीत नसेल. मानभावांच्या मेळ्यांतले कड्यातोड्यांनीं मढविलेले गोजिरवाणे * बाळबोवा ? पाहिले म्हणजे वरील विधानाची सत्यता पटेल. आईबापांचें पोट पिकण्यासाठीं त्यांनीं आमच्या जन्माचें मातेरेंकेलें अशी कबुली जेजुरीस भर खंडोबाचे देवळांत किती तरी मुरळ्या समजू लागल्यावर देतात. हजार सार्धूतं नऊर्शेनव्याण्णव ज्ञानशून्य, व्यसनी, कोपिष्ठ व लालची असतात, आणि त्यांच्या दुर्वासवृत्तीला भिऊन लोक त्यांना पोस १ एका मराठ्याच्या मुलाला लहानपणीच त्याच्या आईबापांनी गांवच्या भवाळाच्या ओटांत घातले, आणि तो त्याच्या घरीं दळण, कांडण, शेणकुर, स्वेंपाकपाणी करीत होता. सोळा सत्रा वर्षांचा झाला तरी त्याला धड बाळबोधही वाचतां वेत नव्हतें. त्याला एकानें म्हटलें कीं, इतकें काम केले तर तुला १०० रुपये साल कॉर्डेही मिळेल. तो म्हणाला, ' बुवा बरा जाऊं देईल ! दुष्काळांत मुलीसह मानभावीण झालेल्या व पुढे मेळा सोडलेल्या एका बाईनें आपली आठ दहा वर्षांची केशवपन केलेली मुलगी मेळावाल्यांकडून परत मागितला.पण दुर्तिचें ऐकेनात.म्हणून तिच्याबरोबर गांवकरी मेळ्याचे मुकामाच्या जागीं गेले, तों मुलाने उत्तर दिलें कीं,'आई मला जारकमला नेते, मी मेळा सोडून येत नाहीं. असले डावपेंच धर्मांतरांत नेहमीं आढळतात, व हीच अवस्था सर्व प्रकारच्या धमंदांक्षा व पंथदीक्षा दिलेल्या मुलामुलींची पर्यायाने असते, हैं चाणाक्ष वाचकाला फोडून सांगणें नको.
पान:अस्पृश्य -विचार.pdf/156
Appearance