Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ गांव-गाडा, कळावयाचें नाहीं; ? इत्यादि वाक्प्रचार लोकांमध्यें ह्या वर्गासंबंधानें वसत असलेली, खरी म्हणा खोटी म्हणा, साशंक भीति दर्शवितात. गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, हिजडे, मानभाव, फकीर, वगैरे देवाचें नांव पुढें करून भीक मागणारे लोक-मग ते फिरस्ते असत किंवा स्थाईक असोत-हा नुसता निरुपयोगीच नव्हे तर समाजघातक वर्ग आहे. ब्राह्मणापासून तों सर्व वर्गांच्या व सर्व जातींच्या लोकांना ह्या वर्गात शिरतां येतें. विष्णूचा पेला प्याला म्हणजे बैरागी होतो, शिवाचा पेला प्याला म्हणजे गोसावी, पिराचा प्याला ह्मणजे फकीर होतो इत्याद. ह्यांनीं संसार नांवाला सोडलेला असतो. त्यांपैकीं बहुतेक संसारिकांपेक्षांही लालुची, लंफंगे, तामसी वं दुव्र्यसनी असतात; आणि लेोकही विशेषतः मारवाडी, गुजराती, उदमी व पाटील त्यांना इच्छाभेोजन,भांग,गांजा, अफू देण्यांत पुण्य मानतात. कोणी आईबापांवर तर कोणी बायकामुलांवर रूसून साधू फकीर होतो, कोणाला आधिव्याधीमुळे प्रपंच नकोसा होतो तर कोणाला पोटाची ददात, यातायात नको असते. ह्या वर्गाची खाण्यापिण्याची मौज, निष्काळजीचें बिनदगदगीचें आयुष्य, कोणाच्याही कह्यांत. वागणें नलगे अशी स्वच्छंदी प्रवृत्ति,लोकांकडून मिळणारा सन्मान, आत्मोद्वाराचें मृगजळ, आणि लांड्या कोल्ह्यांनीं व मुंडणा-यांनीं ह्या जीवनवृत्तीसंबंधानें भरलेलें खासें नामी छत इत्यार्दीना भुलून पुष्कळ मुलगे, मुली, गफलतीनें गोसावी, बैरागी, वाघे, मुरळ्या, भोप्ये, आराधी, जोगतिणी, भाविणी, मानभाव, फकीर वगेरे होतात. मुलें होत नसलीं किंवा होऊन तों वांचत नसलीं अशा स्त्रीपुरुषांना हे लोक अंगारा, प्रसाद, व आशिर्वीद देतात; आणि सांगतात कीं, पहिलें किंवा अमुक एक फळ देवाला वाहा म्हणजे तुझें पोट पिकेल, व वस्तीवाडी वाढेल. गरजवंताला अकल नसते. लोक बिचारे कबूल करतात, आणि जुनी लंगोटी देण्यास मार्गेपुढें करणारे पोटचा गोळा तटकन् तोडून गोसावी, बैरागी, वाघ्या, भोप्या, जोगतिणी, मुरळी, फकीर, मानभाव ऊर्फ भवाळ इत्यादींच्या पदरांत कातात ! अशी एक समजूत आहे की, संकल्पाप्रमाणें मूल वाहिलें