Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फिरस्ते. १३३ पूर्वापार रूढीप्रमाणें १००-२०० तें हजारों वारक-यांना लोक भक्तिभावानें भाजीभाकरी पुरवितात. ह्यांखेरीज दिंडीतले वॉरकॅरी वस्त्रप्रावंरंगाणं, जोडे, घेोंगड्या, छत्र्या, पैसे वगैरे उकळीत चालतात तें वेगळे. कानफाटे केिनरीवर गोपीचंदाचीं गाणीं म्हणतात व पीठ पैसे मागतात. भैरवदीक्षेचे गोसावी संध्याकाळीं आछक पुकारीत पीठ मागतात• गोसावी-वैरागी घरोघर पीठ कपडा आणि गांजा तंबाखूला किंवा यात्रेला अगर एखाद्या मंदिराला पैसे मागतात. ते कधीं कधीं त्रागा करूनही पैसे काढतात. अघोरी राखेघा बोकणा तोंडांत भरून मेल्यासारस्वा पडतो तिळाची पेंड कुजविली म्हणजे तिची विटेसारखी घाण येते. याप्रमाणें नकली विष्टा खाण्याची भीत घालून अघोरी पैसे उकळतो. नानकशाही, कबीरपंथी पैसे मागत गांवोगांव हिंडतात. फकीर, शिद्दी भाकरी, पीठ, कपडा व पैसा मागतात. फिरस्त्या बैराग्यांपेक्षांही फकिरांचें वर्तन आतताईपणाचें व रंगेलपैणाचें असतें. रफई फकीर गुरुजानें भोसकून घेण्याची किंवा मानेंतून ‘सुलतानी' (सळई) घालण्याची जरब देऊन पैसे काढतात. मानभावांच्या झुंडीच्या झुंडी धान्य व पैसे गैोळा करतात. ' बाहेरून काय मानभावीपणा दाखवितो, मानभावाप्रमाणें त्याचें मत कांहीं केल्या १ सन १८०८ सालींपैठणच्यानजीक दहा बारा गांवांत सुमारें २० फकिरांची टोळी पांच रुपये व घोडा पाहिजे म्हणून सवाल घालीत फिरत होती. त्यांना एका गांवानें पंधरा वीस रुपये करून दिले. त्यांत कुलकण्र्यानें रुपया व पाटलानें आठ आणे दिले. कारण विचारतां गांवक-यांनीं असें सांगितलें कीं, ' फकिर दारांतून टूलेना. तो फिरस्ता पडला. आगबिग लावली तर त्याचें घेतां काय!" २ सन १९०८ सालच्या आरंभीं शेवगांव तालुक्यांतील खामपिंप्री गांची दोन प्रहरी कांहीं मानभाव आले, आणि सांगूं लागले कीं, पन्नास मूर्ती गां उपाशीं चालल्या आहेत. गांवानें साडेचारमण धान्य त्यांना करून दिलें, त्याचे त्यांनीं त्याच वेळीं गांवच्या बाण्याजवळ ढिल्या भावानें टके केले आणि रोकड पैसे घेऊन ते चालते झाले.