फिरस्ते. ?マー तांड्यांत जाण्याला धजत नाहींत. त्यांत कोणी गेलें तर पुरुष वर्दळीला येतात, व बायका एकच गिछा करून सोडतात, आणि वेळेला सपशेल नागव्या होतात. कधीं कधीं त्या स्वतःला किंवा पोराला आपल्या हातानें दुखापत करून घेतात, अगर पोराची तंगडी धरून त्याला गरगर फिरवितात व आपटूं लागतात. फांसपारध्यांचा जथा फार जंगी असतो. त्यांच्या तळावर कधीं कधीं माणसें १०० पर्यंत असतात; शिवाय गाई, म्हशी, कॉबडया, कुत्रीं. ते भीक मागतात, बजरबटू व जंगलच्या वनस्पतींचीं औषधे विकतात, पांखरें धरतात, आणि हरीण, डुकर, ससे, ह्यांची शिकार करतात. त्यांच्या बायका जात्याला टांकी लावतात. ते आपलीं गुरें उभ्या पिकांत चारतात, व पेवांतील धान्य, गुरें, शेळ्या, मेंढ्या, व उभे पीक ह्यांची चोरी करतात, आणे जमिनीमध्यें लहान भेग असेल ती खोदून तळाशीं मोठी खांच करून तिच्यामध्यें चोरीचें धान्य घालून तोंड बंद करतात. खानदेशांत सातपुड्यांतील जंगलांत प्रतिवर्षी नेमाडाकडील मेवाती नांवाचे मुसलमान लोक हजारों गाईम्हशी व घोडे चारण्यास आणतात. ते जंगलाची फी भरतात,परंतु आसपासच्या गांवांच्या शेतांना त्यांचा अतिशय उपसर्ग लागतो. शेतांत राखणदार असला तरी पाण्यावर जातांना किंवा या गांवाहून त्या गांवाला मुक्काम हालवितांना ते आपल्या गुरांना शेतांत घुसण्याची इशारत देतात. मग राखण नसल्यावर रात्रीं बेरात्रीं ते आपलीं जनावरें शेतांत घालतात हैं सांगणें नकोच. त्यांचीं जनावरें इतकीं तरबेज झालेली असतात की, त्यांना परकी माणसांचा वास येतांच तीं चौखार निघतात, आणि कांहीं केल्या हातीं लागत नाहींत. पहाडांत वाघाची भीति असते,म्हणून शेतांत रात्री राखण बहुधा नसते. त्यामुळे ह्या हेड्यांचें आयतेंच बनतें. चार सहा वर्षानीं बाय्कॉर्पोरें मिळून शेंपन्नास इराणी किंवा बलुची,पठाण लोकांची टोळधाड रेल्वेजवळच्या खेड्यांनी आणि कचित आड्रस्त्याच्या खड्यानाह्वा बाकळत. घाड, चाकू, कृत्री, सुन्या, कपडा, जुने त्रूट सैन्यारुप्यांची नाणीं, जवाहीर वगैरे विकण्याच्या मिषानें । फिरतात 2.
पान:अस्पृश्य -विचार.pdf/144
Appearance