Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

বৃহৎ गांव-गाडा, डोंबारी, कसरतीचा खेळ करतात. त्यांच्याजवळ म्हशी असतात आणेते त्यांचें दूधतूप विकतात. गांवक-यांच्या म्हशी राखोळीला घेऊन ते अखेर गुंगारा देतात. कोल्हाठी कसरतीचा खेळ, नाचतमाशा करतात. त्यांच्या नायकिणी कसब करतात.कोल्हाट्याचींपालेंगांवांवर आलींम्हणजे उपदंशाचा प्रसार होतो. आपणाजवळ उपदंशाचीं व पुष्टतेचीं रामबाण औषधे आहेत. ' अशी बढाई कोल्हाटिणी मारतात, व लौकिक समजूतही अशीच आहे. खानदेशांत कोल्हाट्याप्रमाणें * उघडया मांडीचें ? ( राजरोष ) कसब करणारी हरदास नांवाची जात आहे. रायनंद, बहुरूपी, भवय्ये (गुजराती) हे नानाप्रकारचींसर्गे आणून पैसे, धान्य व वत्रे मिळवतात. ह्यांचा बेडा मोठसा नसतो. चित्रकथी मोठ्या जमावानें फिरतात. एका गांवीं त्यांचीं ३० पालें उतरलीं, त्यांत माणसें १२७, घोडीं ५, म्हशी ७०, व १७ शेळ्या होत्या. हे म्हशीची हेड करतात, व दूधतूप विकतात. जातीचा एखादा इसम सिता, बधुवाहन वगैरेंचीं चित्रे काढतो व चित्रपट लोकांना दाखवितो; आणि बायका काशाच्या थाळ्यावर मेण व काडी लावून परोपरीचीं गाणीं म्हणतात. तरुण ख्रिया शेतक-याची थट्टामस्करी करतात, व कसबही करतात; त्यांना ' मैना ' म्हणतात. पुरुष व ख्रिया गांवांत भाकरी, वस्त्र व शेतांत धान्य, पेंढी मागतात. पिकाची चोरी करण्यांत ही जात अट्टल आहे. मांगगारोड्यांची टोळी सर्वांत दांडगी असते. एके गांवीं त्यांचा पूरिवार येणेंप्रमाणें आढळून आलाः-माणसें११९,म्हशी २०,हेले ४,गाय१, बैल २, घोडे 2, बकरी ६० शिवाय कॉबडया, कुत्रीं. हे गांवाबाहेरपालांत उतरतात, म्हशी विकतात व भादरतात, नजरबंदीचा गांवगुंडी खेळ ढोल वाजवून करतात, आणि भीकही मागतात. हे जबरदस्त चोर व कृांगावखोर असतात; धान्य, कापूस, शेळ्या, मेंढ्या, म्हशी, कोंबड्या, चोरतातु; आणि उभ्या पैक्रांत आपलीं जनावरें चारतात. हे थोडा' विसार देऊन भाकड म्हशी फळविण्याचा बहाणा करून घेतात, व त्यांना दूरच्या बाजारांत विकून पैसे गट्ट करतात. गांवकरी ह्यांच्या