फिरस्ते. १२१ ओढतो, आणि सूप अर्धसूप धान्य, पैसे व कपडे गोळा करतो. तिरमल ऊर्फ नंदीवैलवाले, मेडिंगे ऊर्फ ठोकेजोशी, कुडसुडेजोशी, वासुदेव, पांशूळ, हे गांवाबाहेर गेीादड्याच्या किंवा पोत्याच्या पालांत उतरतात. त्यांचीं दहापांच बि-हाडें मेळानें फिरतात. त्यांजवळ म्हशी, बैल, बकरें, तड़ें, कुत्रीं, असतात. तिरमल नंदा पैल शिकबून त्याच्याकडून होरा वदवितात. त्यावेळीं ते गुबगुबी व घड्याळ वाजवितात. ते धान्य, वस्त्र, पैसे मागतात. त्यांस दर घरचा १ पैसा मिळतो. त्यांच्या बायका गोदडया शिवतात व पोत, सुई, दाभण विकतात. एका गांवीं तिरमलांचा तळ येणेंप्रमाणें होता: माणसें ३०,नंदीबैल एक,तडें७,टोणग २, ह्माशी ४,बैल१०,शेळ्या ५,कुत्रीं८,शिवाय कोंबड्या.मेर्टिगे ऊर्फ ठोकेजोशी सकाळीं भस्म, गंध लावून डोक्यावर पागोट्याची ढाल ठेवून लफ्फेदार रेशीमकांठी धोतर नेसतात, आणि हातांत पंचांग घेऊन कुणब्यांना शुभाशुभ ग्रह, होराठोका सांगण्याला शतशेतीं जातात.त्यांच्या बायका सुई, पोत वगेरे विकतात. ते गायी, ह्मशी, तड़ें, विकून हजारों रुप पांचा व्यापार करून राहिले आहेत. कुडमुडेजोशी, गुरुनाळसंतोष, वासुदेव, पांगूळ रामप्रहरीं पाऊड गाऊन आयाबायांना व लेकरांना आशिर्वाद देतात. त्यांच्या पाऊडांत यात्रांच्या ठिकाणच्या देवांचीं नांवें व काश्वत वडेि. लांचीं नांवें असतात. त्यांच्या वायका ' वाकळ' (गोदडी ) शिवतात, व घंगड्या तुणतात. कुड्मुडेजोशी कुडमुडे वाजवितो. वासुदेव टाळ, चिपळया, व पावा वाजवितो, आणि त्याच्या डोक्याला मोरपिसांची टोपी असते; त्याला दर घरीं पैसा दोन पैसे मिळतात. राऊळ कोठं कोट्यांच्या फण्या भरतात, पण बहुधा पहाटेस भला मोठा त्रिशूळ घेऊन एखादा दोहरा म्हणत भीक मागतात. दुरवेशी मुसलमान असेतात, ते वाघ आस्वलाचे खेळ करून सुगीच्या दिवसांत खळीं मागतात. त्यांना बागवाले (वाववाले) असेंही म्हणतात. मद्वारी गारोडी मुसलमान असतात व तं सापाचा आणि नजरबंदीचा खेळकर -तात. मुसल - خ ه पान बंदरवाल, वानर, माकडं, व बोकड ह्यांचे खेळ करतात. गोव्या
पान:अस्पृश्य -विचार.pdf/142
Appearance