Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फिरस्ते. 吸领乌 आहे. कुंचेवाले ऊर्फ माकडवाले ही कैकाड्यांची पोटजात आहे. ते गांवाबाहेर सुरड नांवाच्या गवताच्या पालांत उतरतात. त्यांचीं दहा बारा बि-हाडे एकमेळानें असतात, व त्यांबरोबर माकडं, गाढवें, बकरीं, कोंबडया, कुत्रीं असतात. ते माकडांचा खेळ करतात व साळी, कोटी, धनगर, मोमीन वगैरेंच्या कुंच्या बांधतात. ह्या कुंच्या ते गवताच्या मुळयांच्या करतात; व त्या सव्वा तें दीड रुपयाला विकतात. त्यांच्या बायका बायकांना गोंधतात, शिंदीचे खुळखुळे विकतात, व सुपें, टोपलीं फोकाट्यांनीं सांधतात. बायका, पुरुष, पौरें गांवांत तुकडे व शेतांत धान्य मागतात. एका गांवीं कुंचीवाल्यांचीं ४ पालें उतरलीं होती, त्यांत माणसें २३, गाढ़वें ༢༢, कुत्रीं ', माकडें 'i, बोकड R, व एक कोंबड्याचा झांप होता. कंजारी ही सांनसी नांवाच्या दरोडखोर जातीची एक पोटजात आहे, व ती गांवाबाहेर पालांतून उतरते. ते साळी वगैरेंच्या कुंच्या बांधतात; शिंकीं, हातळ्या, जोतीं-तुंपण्या, पिछाड्या, मो-हक्या वगैरे करतात; आणि कानांतला मळ काढतात. त्यांच्या बायका टाळ्या पिटून अचकटविचकट हावभाव करून उखाणे म्हणतात, आणि ऐकणाराला अगदीं शरमून टाकून भीक उकळतात. लमाण, वंजारी हे पूर्वी बैलांचे तांडे घेऊन मीठ व सरपण ह्यांची नेआण करीत. आतांही कांहींजण बैलांचें भाडें करतात, व जनावरें राखोळीला घेतात. त्यांच्याजवळ कुत्रे फार नामांकित असतात. ते गांवाजवळ मैदानांत उतरतात आणि त्यांच्या तांड्यांत & o o — Q, o o बैल व ५० - ६० माणसें असतात. ते बैल, शेळ्या, मेंढ्या व उभी पिकें ह्यांची चोरी करतात. वैदूगांवापासून एक दोन शैर्ते दूर उतरतात. त्यांचीं दुहा बारा वि-हाडें जमावानें फिरत असतात. त्यांच्याजवळ गाढवें, शेळ्या, कोंबडया, व पुष्कळ शिकारी कुत्रीं असतात. ते ससे, तरस, घोरपडी, सर्प मगर धरतात. कोणाच्या घरी साप निघाला तर शेरभर दाणे घेऊन ते तों धरतात. त्या वेळी त पुंगी वाजवीत असतात. तापीकांठीं मगारांना त्यांचा इतका दरारा आहे कीं, वैदूचा शब्दकानींपडतांचवाळवंटांत असलेले मगर