१०४ गांव-गाडा. त्यामुळे हरघडी उष्ट्याचें नांव पुढें करून ते अन्न मागत सुटतात. दिवाळीला सर्वकारूनारू ओवाळणी मागतात. त्यावेळीं त्यांना चोळीचे खण व पैसे द्यावे लागतात. लग्रामध्यें वराचा शेला महाराला मिळतो. ग्रहणाचे वेळीं महार मांग धान्य,वस्त्र व पैसे मागतात. अमावास्या व मरेआईची पूजा मांगाकडे आहे. कोठं कोठं महारही हैं काम करतात. मांगांना दर अमावास्येच्या दिवशीं 'सतका मतका ? (उडिदांची डाळ,राळे अगर इतर धान्य, पीठ, मीठ, मिरच्या, तेल इत्यादि जिनसा) घरोघर मिळतो. आषाढांत व विशेषतः पटकी सुरू झाली म्हणजे हे मरेआईचे पुजारी दर मंगळवारशुक्रवार दोंडी देऊन घरोघरचा नैवद्य मागवितात. नैवेद्याबरोबर नारळ, पैसा सुपारी, बांगडया, खण वगेरे असतात. बहुतेक ठिकाणीं मरेआईसाठीं सवा मण किंवा अधिक भाताचा बळी काढतात, मांगिणीला हिरवें लुगडें चोळी बांगड्या देतात, आणि मिरवणुकीचे वेळीं खूप नारळ फोडतात व लॅिवें कापतात. मरेआईचें उत्पन्न किती होत असावें ह्याचा खालील गोष्टीवरून अंदाज होईल. कर्जत जिल्हा नगर येथें सन १९१२ साली गांवक-यांनीं महारांकडून मरेआईची पूजा करावली, आणि सुमारें २५० रु. रुपये देऊन त्याच्या बायकोच्या अंगांत मरेआई आणविली, आणि तिजकङ्कन असें वदविलें कीं, मला महाराची पूजा पावली नाही,मांगांची हजे ! ख्रिस्ती झालेले महार मांग सुद्धां तेवढया पुरते मरेआईचे भगत बनून आपली तुंबडी भरून घेतात!! प्रेताचें सरण वाहण्याबद्दल वतनदारांकडून महार प्रेतावरील वस्त्र, विसाव्याचे जागेचा पैसा व दिवसाचें । घेतात; आणि इतरांपासून पांच आणे तें सवारुपया-प्रेग-पटकीचे दिवसांत दोन रुपयेपर्यंत-मजुरी घेतात. बलुत्यांतच पूर्वी महार जनावरें ओढून नेत आणि त्यांचं माती हाङ्क् घेऊन मिरासदारांना कातडें आणून देत. उपन्या जवळून् तदन तं. सह पायली धन्यू, अगर आठ आणे तूं रुपया तुर्या कंपुतदेत; अशी स्थिति असावी. जनावर ओढण्यासाठी जी धान्य महाराना देतात त्याला 'घाटा’
पान:अस्पृश्य -विचार.pdf/125
Appearance