Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बलुतें-आलुतें. १°३ गांवांत पेंव फोडलें म्हणजे पेंवगुड मागण्याला महार जागले जातात. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ घरोघर वेसकरांना भाकरी मिळते. ह्याखेरीज झाडणार महार-महारणी दररोज भाकरी मागतात. साल बदलून नवे महार कामावर आले म्हणजे ते 'भावईचे चेले दह्या दुधानें न्हाले । वर्षानुवर्षा पाऊस पाणी घेऊन आले ” ॥ हैं गाणें म्हणून घरोघर शेर मागतात.ते भाद्रपदांत पितरें मागतात, व आश्विनांत दसरा मागतात. कठीण दिवस म्हणून कुणब्यानें पितराला एखाददुसरा जातिबांधव सांगितला तरी दारापुढें महारांचें कडें पडतें, आणि बहुतेक भरती त्यांचीच करावी लागते. ह्यांखेरीज बारा सण, दिवस, व लग्रकार्य इत्यादि निमित्तानें जेव्हां जेव्हां गांवक-यांच्या घरीं चार पानें टाकतात तेव्हां तेव्हां महार जागले व सर्व कारूनारू ह्यांना वाढणीं द्यार्वीं लागतात; आणि तो ऐपतदार असला तर लग्र, दिवस वगैरे प्रसंगीं सर्व कारूनारू पंक्तीचा ठाव म्हणजे जेवण मागतात. वरवर पाहणाराला असें वाटतें कीं, खेडवळ विशेषतः कुणबी लग्र दिवसाला उगीच जेवते गण गोळा करून बुडतो. पण आंतली गोम अशी आहे कीं, व-हाडी व जातभाईपेक्षां कारूनारूंना जास्त अन्न जातें; आणि तें ते हकानें काढतात. त्यांना नाहीं म्हणून चालावयाचें नाहीं. कमी पडलें कीं नुकसान झालेंच समजा. म्हणून सर्वजण निमूटपणें उरावर धोंडा ठेऊन ह्या पेंढारांची पोटपुजा करतात. अन्न उकळण्याचे कामीं महार मांगांची सर्वांवर ताण असते.' महार जागल्यांशिवाय इतर कारूनारू बहुधा आपापल्या असाम्यांकडेच वाढणें किंवा जेवण मागतात. परंतु महार जागले व त्यांचे जातभाई हे सर्व मिळून प्रत्येक गांवक-याच्या घरीं वाढणें मागण्यास जातात, व त्यांना शेर दोन शेर अन्न सहज लागतें. महार मांग व हलालखोर हे मुसलमानासुद्धां सर्व जातींचें उटें खातात, १ ह्याचा अनुभव युरोपियन मिशन-यांनाही आहे. संगमनेर येथें रोमनकॅथॉलिक विभापसाहेब आले, तेव्हां बोलावल्याच्या दिढीदुपर्टीनें मद्वारमांग रिवस्ती गोळा झाले, आणि त्यांनी फादर वायझेंप साहेबांना नवीन दळण घालावयास व चुली पेटवावयास लावलें, तेव्हां कशी तेरी पंगत उठली !