*2 गांव-गाडा. जो तो आपली जागा साफ करतो. देशांत जसजशी दुकानदारी वाढली, सडका, रहदारी बंगले झाले, तसतशी सरबराईच्या कामांतील महारजागल्यांची पायपीट कमी झाली. हव्या त्या जिनसा दुकानांत मिळू शकतात; आणि सरकारी सामान व्यवस्थेनें लावणें, तें सांभाळणें,गाड्या ठरविणेंइत्यादि कामांसाठीं अंमलदारांबरोबर सरकारी खासगी नोकर असतात. अंमलदार देोन ते आठ दहा रुपयेपर्यंत पोस्त देतात. मामलेदारापर्यंत सरकारी सामानाचें गाडीभाडें मिळतें, त्यामुळे महारांची सरकारी बिगारही कमी लागतो. पाटील-कुळकण्र्यांचीं दोन्हीं अंगें उर्णी पडल्यामुळे त्यांना महार सरकारी कागद महार-जागल्यांनीं ठाण्यांत न आणतां टपालांत टाकले, ते नाटपेड झाले, आणि त्यांचें पाटील-कुळकण्र्यांनीं भरलेलें हशील महारजागल्यांनीं दिलें नाहीं, असें कित्येकवेळां पाहण्यांत येतें. महार-जले पूर्वीइतके पाटील-कुळकण्र्यांबरोबर गांवांत व परगांवीं जात नाहींत. शंकसाखळी घेऊन सर्कल इन्स्पेक्टरबरोबर शिवारांत जाण्यासाठीं महार काढणें झाल्यास पुष्कळ पाटलांना महारवाड्यांत हेलपाटे घालावे लागतात; नंतर याची बारी आहे याची विचारपूस सुरू होते, आणि बारीवाला घरीं नाहीं अशी तास अर्धांतास खळखळ चालून कसातरी महार मिळतो. लोकस्थितीचें सूक्ष्म निरीक्षण करणा-या परशराम कवीनें केव्हांच भाकीत केलें, पाटीलकुळकर्णी नांव उगीच घालून दमले येरझारा । सत्ता साहेबी अगर्दी बुडाली महाराचा त्यांहूनी तोरा ॥ स्वराज्यांत गांवक-यांचें वित व जीवित ह्यांचें नेहमीचें रक्षण सरकाराकडून होत नसे. म्हणून गांवगाड्यानें महार-जागल्यांचें एक लहानसें लष्कर तयार केलें; आणि दरोडखेोर व बंडखोर ह्यांशीं झुंजणें व गांवमुकादमानींतली जातिपरत्वें कामें, ह्यांचा ठोकळ अंदाज पाहून गांवानें त्यांची संख्या
पान:अस्पृश्य -विचार.pdf/115
Appearance