वतन-वेतन. 2೩ उत्सव, संतानप्रातेि , विवाह वगैरे प्रसंगीं महार, मांग, कोळी, तमासगीर, गोसावी इत्यादिकांचे मानपान-हक होऊन बसल्या आहेत. असे खर्च न केले तर नामुष्की होते. ‘भीक मंगना पन म्हशालजी रखना;'ऋण फिटतें पण हीन फिटत नाहीं;' असला जमेदारी खाक्या असतो. त्यांचा मुशाहिरा पाहिला तर त्यांत नित्य खर्च निघणें कठीणः आणि नैमितिक खर्चासाठीं वडिलार्जित स्थावर जंगम किती पिढ्या पुरणार ? मेहनत करून म्हणजे खुषीची किंवा जुलमाची पानसुपारी. वारसाची किंवा लायकीची चैौकशी, राजस्टराकडे ओळख किंवा मिळकतीची चतुःसीमा वगैरे कामांत गरजू पक्षकारांनीं त्यांना खूष केलें नाहीं तर दिवस मोडून काम बिघडतें. पाटील-कुळकर्णी कलभंड असले तर त्यांचा प्रळय बराच फैलावतो. तरी पण वाम मार्गानें गबर होणें कठीण, हैं लहान मूल वतन मिळविण्यासाठीं वतनदार एकमेकांचें उणें काढून त्यांना रसा १ एका गांवीं एका विधवेच्या नांवानें कुळकर्णाची आणेवारी लागली होती. ती तिच्या दृष्यातींतच आपल्याला मिळावी, म्हणून तिच्या जवळच्या भाऊबंदानें ती व्यभिचारी असल्याचा बनावट पुरावा करून तिला वतनांतून वजा करण्याचा प्रयत्न केला. तो असा:-गांवच्या जननमरणाच्या रजिस्टराची एक प्रत महिनाअखेर डेप्युटी सॅनिटरी कमिशनरकडे जाते; व अस्सल कागद तालुक्यांत दोन वर्षांनीं जातो. महिनाअखेर डेप्युटी सॅनिटरी कमिशनरकडील प्रत निघून गेल्यावर ह्याला युक्ति सुचली कीं, गांवच्या प्रतींत ती बाळंत झाल्याची नोंद करावी, आणि पुढे मार्गे तालुक्यांतून तिची नक्कल मागवून तिला व्यभिचारी ठरवावें, म्हणजे तिच्या नांवावरील आणेवारी आपल्या नांवायर चढेल. कांहीं वर्षानीं साप्रमाणें त्यानें अर्ज देऊन चोकशी उपस्थित (पृष्ठ ८६ पढ़ा. ) ,
पान:अस्पृश्य -विचार.pdf/106
Appearance