पान:अशोक.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ वें] समालोचन. ७९ वाटू लागले होते; किंबहुना लग्न झाले असते, तर एकंपती किंवा एकपत्नीव्रताने राहण्याचा प्रसंग ओढवला असता, त्यापेक्षा आपल्या वासनातृप्तीच्या आड न येणारे हें नामधारी ब्रह्मचर्य फार चांगले असें वाटूं लागण्याइतकी मजल येऊन पोचली होती. सारांश; ज्या ज्या संस्था प्रथम चांगल्या स्तुत्य उद्देशाने निर्माण झाल्या, त्याच पुढें वाइंट लोकांच्या हाती गेल्यामुळे, ख्रिस्तीधर्माच्या विटंबनेस मात्र कारण झाल्या. या सगळ्या अनर्थाचें मूळ कॉन्स्टंटाईन याने सद्बुद्धीने दिलेल्या जाह- गिरी, इनार्म इत्यादि होत. अर्स खुद्द ख्रिस्ती ग्रंथकारही कबूल करतात. बौद्धधमोच्या इतिहासाचें मार्मिक अवलोकन करणारांस थोड्या फार अंशाने असाच प्रकार बौद्धधर्मांतही झालेला आढळून येईल. अशो-/ काच्या पुरस्कर्तृत्वामुळे बौद्धधमोचा प्रसार नुसत्या हिंदुस्थानांतच काय, पण ग्रीस, चीन, जपान, सिंहलद्वीप वगैरे दूरदूरच्या देशांतूनही झाला ही गोष्ट खरी आहे, पण त्याने भिक्ष व भिक्षणी यांना राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या वगैरे ज्या सोयी करून दिल्या, त्यामुळे धर्माविषयींची श्रद्धा व नीत्याचरणाविषयींची आसक्ति कमी कमी होऊन, आळस व दुराचार यांचे प्राबल्य झाले व हेच शेवटी त्या धर्माची धूळधाण करण्यास कारण झाले, हें नाकबूल करता यावयाचे नाही आणि ह्मणूनच "An ! Constantine, of how much ill was cause, Not thy conversion, but those rich domains, That the first wealthy Pope received of thee." हे डांटी कवीचे उद्गार किंचित् फेरफार करून अशोकालाही लावितां येतील. Whurenonyms mane . Sirvyatarjethnerater directer-lbeere