पान:अशोक.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

অল্লাহ্বাচ্চত্র शिक्ज़ 需 অর্থাৎ ቅ?ኞኞ. ਬਰ প্রক্স, থাইল্যাভয় । অনুজ্জা সুতন্ত্ৰীজৰ গ্ৰীষ্ক, জুৰী-ছিঃ ! e9 = वतन-वेतन. He OpCae गांव-मुकादमानीचा परिणाम जनतेच्या दोनतीवर फार अनिष्ट झाला. इसवी सन १८१८ सालीं क्यापूटन ब्रिग्ज ह्यांनीं खानदेशाचा ताबा घेतल्यावर तेथील लोकस्थितीचें जें निरूपण केलें आहे, तें इतत्रही लागू पडण्यासारखे आहे. ते म्हणतात-अगदीं साध्या गोष्टीतसुद्धां खरें ‘काय आहे, हें लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेनें ते नेहमीं राईंचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकाशीं अन्यायाचें वर्तन ह्यांचें प्रमाण इतर्क वाढलें होतें कीं तें सांगूं गेल्यास केाणी खरेंसुद्धां मानणार नाहीं. धाकटे घराण्यांत अवश्य तितकी धूर्तता आणे रोकड मात्र पाहिजे, कीं त्यानें वडील ‘घराण्याच्या तोंडाला पानें पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दतरांतसुद्धां बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल स्वरे दस्तैवज मिळविण्यासाठीं मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली. शेतक-यांच्या अनाथ स्थितीला तोड उरली नाहीं,असें झालें. मामलेदार, लष्करी लोक, सावकार, पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांड्ये ह्यांना मात्र अकरावा आला. दुर्बल-प्रबलांच्या झगड्यांत लबाडी आणि कावेबाजपणा हींच काय तीं हत्यारें दुर्बलांला कामास येतात. लोक जात्या लुचे किंवा पापपुण्याला न मानणारे असतात असें नाहीं. पण जुलमांतून कसें बसें निसटून जाण्याला त्यांना असत्याचा अवलंब करणें प्राप्त होतें. अशा भूमींत इंग्रजी राजसत्तेनें आपला नांगर टाकला व जसजशी व्यवस्था लागत गेली तसतसे सुभे,सरकार-परगणे वगैरे राज्यविभाग मोडले. देशमुख, देशपांड्ये, हावलदार वगैरे महाल जमेदारांचे देव्हारे मराठशाहीत डगमगू लागले; ते इंग्रजीत सन १८६३ सालीं पार बसले. पहिल्या पहिल्यानें देशमुख-देशपांड्यांना वसूली कामगार समजत,व तें काम ते स्वतः ।