पान:अशोक.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अशोक.

आणि त्यामुळेंं अशोकाच्या चरित्राची इंग्रजी व मराठी ग्रंथभांडारांत वाण होती, ती पुरी होण्याचा योग अद्यापपर्यंत आला नाहीं.

 अशोकाचें साद्यंत चरित्र इंग्रजी भाषेत जरी अद्याप झाले नाही, तरी बंगाली साहित्यांतली ती उणीव बाबू कृष्ण विहारीसेन यांच्या परिश्रमानें पूर्ण झाली आहे. तथापि सेनप्रणीत अशोक चरित्रांत एक मोठी गोम मला ही आढळली की, त्यांनीं अशोकासंबंधाने ठिकठिकाणीं जीं विधानें केली आहेत, त्यांना खरोखर आधार किती आहे किंवा ती केवळ तर्कसिद्ध आहेत याचे स्पष्टीकरण कोठेही केलेले नाही. त्यामुळे त्या पुस्तकावरही मला अवलंबून राहतां येईना. अखेर सर्व माहिती स्वतः गोळा करण्याचा निश्चय करून, त्या दिशेनें आज दोन तीन वर्षे केलेल्या परिश्रमाचं हें फळ महाराष्ट्र वाचकांस अत्यादराने अपेण करण्यांत मला फार संतोष वाटत आहे.

 प्रस्तुत चरित्रास मुख्य आधारभूत ग्रंथ झटले झणजे, पाली भाषेतले महावंश आणि अशोक अवदान हे ग्रंथ, इंग्रजीतले मि० दत्त, डा० राजें लाल भित्र, मि० बीलजनरल कनिंगळम्, मि० सेन्टी, मि० पॉल कॅरसव, प्रो. हिस डेव्हिड्स यांचे ग्रंथ व बंगातले सेनप्रणति अशोक चरित्र आणि ‘साहित्य’ मासिक पुस्तकांतले 'मौर्यसम्राट् अशोक' शीर्षक निबंधचतुष्टय हे होत. याशिवाय इतर किरकोळ ग्रंथांचेही पुष्कळ साहाय्य झाले ह्या सर्व ग्रंथकारांचा व मिळवून देण्याचे काम आह• सदरहू ग्रंथ ज्यांनीं मनःपूर्वक साहाय्य केलें अशा मित्रांचा मी अत्यंत आभारी आहें. या संबंधांत माझे मित्र रा. रा. गंगाधर रामचंद्र मोगरे आणि रा० रा० आनंदराव सोहिरोबा तेलंग यांचे उपकार मी कधीं विसणार नाही.

 हें एका अंकांत देण्यासाठी मुद्दाम लिहिल्यामुळं,पुस्तक ग्रंथमालेच्या ८० पृष्टांत सगळ्या माहितीचा समावेश करावा लागला, व त्याप्रमाणें तें लिहून तयारही झालेंपण पुढे आकस्मिक रीतीनें लेखकाचा अतिशय