पान:अशोक.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. ५३ काम करी. सुतार, लोहार, वगेरे कारू आपापलीं जातकामें करीत व विस्तारानें सांगितलीं आहेत. मुसलमानी अमलांत तहासलीचा वसूल करणें हें देशमुख,देशपांडये ह्यांचें मुख्य काम होतें. त्यांचेकडे फौजदारी काम असल्याचें दिसून येत नाहीं. तथापि गांवाची किंवा शेताची शीवतकार, इनाम, वतनें वगेरेंची वारसचौकशी, वांटणी इ. दिवाणी पंचायतींत ते प्रामुख्यानें असत. सरकारतर्फे आपापल्या महाल परगण्यांतील पाटलांशीं ते गांवच्या महसुलाचा ठराव करीत. वसुला वीसूट, तहकुबी मागण्यांत, तगाई आणविण्यांत व ह्यासारख्या इतर रयत-हिताच्या कामांत पाटीलकुळकण्यांना त्यांचें चांगलें पाठबळ असें. पुढें पुढें मुसलमान राजे सबंध परगण्याच्या वसुलाचा इजारा त्यांना देऊं बसवून बेलाशक वसूल तोंडांत टाकू लागले. मराठेशाहींत त्यांचे बहुतेक वसुली अधिकार संपुष्टांत येऊन ' खालसा ? ( सरंजमाप्रीत्यर्थ दुमाला न झालेला) महाल मामलेदारांकडे किंवा कमाविसदारांकडे कमाविसीनें देत. तथापि पाटील, कुळकर्णी इरसाल भरण्याचा हिशेब देशमुख देशपांड्यांकडे गुजरीत; आणि सालअखेर मामलतीचा ताळेबंद आपल्या दप्तराशीं रुजू पाहून तो बरोबर आहे अशाबद्दल देशमुखदेशपांड्यांना व दिवाण, फडनवीस, पोतनवीस वगैरे दरकदारांना त्यावर व त्यासारख्या दुस-या हिशेबी कागदांवर मखलसी करावी लागे. महालजमेदार पिढीजाद वतनदार असल्यामुळे सरकारांत त्यांना शिरकाव भिळे व ते मामेलदाप्रांच्या जुलमाबद्दल व गैरवर्तनाबद्दल दरबारांत कानगी करीत. त्यामुळे पंगारी कामगारांना त्यांचें एक प्रकारचें बुजगावणें असे. गांव-जागल्यांवर जशी पाटलाची देखरेख असे तशी परगण्यांतील समस्त जागल्यांवर परगणे-नायकाची होती. गांवमुकादमांना व महालजमेदारांना नोकरीबद्दल सरकारांतून इनाम म्हणजे दुमाला जमिनी, नक्त नेमणुका व रयतेवर रोखीचे अगर