पान:अशोक.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांव-मुकादमानी. 영 प्रांताला दिवाण, फडनवीस, पौतनवीस, मुजूमदार वर्गेरे वतनदार हुद्देदार असत, त्यांना दरकदार म्हणत. पोतनविसाकडे प्रांताचे नगदीचे हिशेब व फडनविसाकडे सबंध दप्तर होतें. दरकदारांची तपासणी परगणे अमलदारांच्या कामांवर असे. परगणे पाटील, देसक, देशमुख, देश वतनदार परगणे-अंमलदार हेोत. त्यांना जमेदार, महालजमेदार, जमीनदार अथवा हकदार म्हणत. देशपरत्वें त्यांचे निरनिराळे पर्याय झाले. देसाई, नाडगीर, नाडकर्णी, नाडगैडा, मुजूमदार, मोहरीर, मोकाशी, शेकदार, हे सर्व महालजमेदार हेोत. जमेदार, दरकदार व प्रांत-वतनदार ह्यांना । बहुमानानें देशाधिकारी म्हणण्याचा संप्रदाय असे. गांवाला जसे पाटील, कुळकर्णी, जागल्या, तसे परगण्याला देशमुख,देशकुळकर्णी,देशपांड्ये, देश-- चौगुला, परगणे-नाईक हे हेोत. देशमुख,देशचेौगुला हे मराठे; देशपांड्ये, ब्राह्मण; व महाल नाईक मिठ्ठ, रामोशी, किंवा कोळी असत. वतनाप्रीत्यर्थ मुसलमान झालेले देशमुख, देशपांडचे, परगणे-नाईक, कोटें कोटें दृष्टीस पडतात. सर्व ग्रांमाधिकारी वंशपरंपरेचे हुद्देदार होते. ह्या वर्गात नुसतें गांवच्या दप्तरचें काम करणारे गांवकामगार व त्यांचे हाताखालील गांवनोकर येत होते असें नाही, तर यांमध्यें गांवच्या नित्यनैमितिक गांवकी व घरकी व्यवहाराला उपयोगी असे कारूनारू, उदमी, तमासगीर’ भिक्षुक, वेगेरे सर्व येत; आणि त्यांना गांवकीसंबंधानें थोडें फार नेमलेलें काम तेक पगारी व वतनी अंमलदार मिजासखोर बनल्यामुळे ते फिरतीवर निघाले देशपरत्वें व जातिपरत्वें निरनिराळीं नांवें पडलीं आहेत. इग्रेज सरकाराने उपयोगाच्या दृष्टीनें त्यांचे तीन वर्ग केले आहेतः सरकारउपयोगी, रयतउपयोगी, आणि सरकार व रयत ह्या दोघांनाही निरुपयोगी. वतनदारांची