पान:अशोक.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 इंग्रजी अमलाखाली हिंदुस्थानांत सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झाला आहे. प्राचीन विधेचे पुनरुज्जीवन होत आहे; सहिष्णुता आणि धर्मस्वातंत्र्य हीही आन दिसत आहेत. राष्ट्राच्या अभिवृद्धीचींही ( खरी खात्री लायक ) चिन्हे आहेत. तेव्हां अशा काळ एखाद्या धर्माची निंदा कर- ण्याचे अगेदर त्याची माहिती कोणी करून देत असला तर त्याचे ह्मणों ऐकून घ्यावेसृष्ट चमत्काराचे पृथक्करण आणि त्याच्या कारणांचा शोध ही शास्त्रीय ज्ञानाच प्रधान अगं हांत हे सांगावयास नको.

 बौद्धधर्म हा आर्यावर्तातला धर्म, आर्यावर्तातल्या लोकांना इक्ष्वाकुवं शोद्भव एक श्रेष्ठ आर्यानेच मूळ उपदेशिला आहे, आणि श्री वासुदेव गोविंद आपटे यांचे प्रस्तुत अशोक चरित्राचे पुस्तक त्या धर्माविषयींची महाराष्ट्रीयांची स्मृति पुनः एकदां जागृत करील अशी मी खात्री बाळगतो. महाबोधी सभा. १ मद्रास १३ आटोत्रर बौद्ध संवत्सर २४४ ३. अंगारिक एच्. धर्मपाल, • /