पान:अशोक.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृत्ति. შat9 तर त्यानेंही आम्हांला आमच्या मुलाबाळांच्या काळजींतून मुक्त करावें. सारख्या महत्वाच्या तहाहयात असाम्या वंशपरंपरेच्या केल्या, आणि सामान्यत्वें ह्या वंशपरंपरेच्या स्थावर नेमणुकांना इनाम ही संज्ञा प्राप्त झाली. सरकारच्या सार्वजनिक नोकरीच्या मोबदल्याबद्दल जमिनीचें उत्पन्न तोडून देण्याची जी ही योजना निघाली, ती सर्व प्रकारची सार्वजनिक नोकरीच काय पण वैद्यकी, गायन, नर्तनाप्रमाणें थेट निवळ खासगी नोकरी व भीकमाग्या दरवेसपणापर्यंत पांगली. हिलाच वतनपद्धति पाठिंबा मिळाला तसा राजाकडून राज्यव्यवस्थेत व धर्माध्यक्षांकडून धर्मव्यवस्थेंत मिळाला. वतनी व्यवस्था गांवकींत सुदृढ व विस्तृत होण्याला वतनी राज्यव्यवस्था व धर्मव्यवस्था जशी कारणीभूत झाली, तशी जातिपोटजाति व पंथ ह्यांमध्यें जी धंद्यांची विभागणी झाली, तीही ब-याच अंशांनीं कारणीभूत झाली. जातिधर्माप्रमाणें अमुक धंदा अमक्या कुडीत १ नाहीं म्हणावयाला पुण्यश्लोक शिवाजीमहाराज मात्र इनाम देण्याला प्रतिकूल होते.'तो शिवाजी बहुधा कोणास जहागिर देत नसे...शिवाजीचे किती एक मानकरी लोक मसलत करीत कीं, लष्करास खर्चाची नेमणूक परभारें गांवगन्ना करावी, परंतु तें शिवाजीच्या मनास येईना, कां कीं, ते लोक स्वयें सत्ता करूं लागतील आणि रयतेस उपद्रव होईल हैं, तो जाणत असे,* ग्रैंटडफक्त मराठयांची बखर पानें ६४-५.