पान:अशोक.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अशोक.

शाक्य गोतम ज्या पवित्र बोधिवृक्षाखाली बसून २४८८ वर्षांपूर्वी श्रेष्ठ बुद्ध पदवीला पोहोचला, त्या वृक्षाची एक शाखा इतिहासप्रसिद्ध अशा अनुराधापुरनामक नगरींत त्यांनी नेऊन लाविली.

 बौद्ध धर्म कित्येक शतकॅपर्यंत हिंदुस्थानांत राहिला आणि हिंदु स्थानाच्या बाहेरही त्याचा प्रसार इतका दूरवर झाला होता की, पूर्वेकडे आरबस्थानाच्या सीमेपासून ते पश्चिमेकडे जपानच्या हद्दीपर्यंत सर्वत्र परमप्रेमा' च्या मताच्या मंजुळ ध्वनि ऐकू येत होता. परंतु इत- क्यांत लांब आरवस्थानच्या किनाच्यापाशीं वादळ झाले आणि प्रतिमा भंजक इस्लामी धर्माच्या भयंकर वावटळींत बैौद्धधर्मीयांचे प्रशस्त विहार आणि साधुसताच ग्रंथभांडार यांचा चुराडा झाला ; व खोतान , कागारिया, खोरासान, मध्यएशिया, गांधार, काश्मर आणि हिंदु- स्थानापासून जावाचटापयतचा प्रदेश यवढ्या टपूतला बद्धधम नष्ट झाला. दहाव्या शतकापासून त सोळाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत मुसलमा नांच्या हातून बैौद्ध ग्रंथांचा सारखा नाश होत होता. (टॉडकृत राजस्थान पहा ). उत्तर हिंदुस्थानांत शैवधर्मे मिहिरकुल आणि शशांक यांचे सारख्या बैौद्धधर्माचा राजांन राजकारणास्तव नाश करण्याचे व्रत आरं भिलें. परंतु त्यांच्या नंतरच्या कित्येक राजांनी त्याला पुन्हा आश्रय दिला. चौदाव्या शतकांत सुधन्वन् ऋणून कोणी राजा दक्षिणेत होऊन गेला. ते हिंसा निषेध करणायास देहांतशासन करीत असे, असे कळते. परंतु , जैनधर्मयाविषयींची ही गोष्ट असावी, बौद्धा विषयीं नव्हे, असे दिसते.

 आर्यधर्माचीं तत्वें त्यांच्या अत्यंत शुद्ध स्थितींत लोकांना उपदे- शून त्याचा प्रसार सर्व एशियाखंडभर करण्याचे व परदेशीयांना देखील त्याच्या छत्राखाली आणून सोडण्याचे श्रेय एकट्या वैद्धधर्मार्ने संपादिले. सेमिटिक धमांच्या अमंगळ संसर्गाचा विटाळ होउं न देतां अत्यंत शुद्ध स्थितींत राहिलेला मैौद्धधर्म पाहणे असेल, तर तो आज जपानांत पाहू ण्यास सापडल.