पान:अशोक.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

rr; गांव-गाडा. नुसार ज्या त्या वर्णातले लोक सामान्य धर्मापेक्षां आपापल्या वर्णविशेष धर्माला जास्त भाजूं लागले. धंद्याच्या स्वरूपावरून एक धंदा दुस-या धंद्यापेक्षां अधिक पवित्र व मानार्ह अशी धंद्यांची प्रतवारी लागून अखेर एकाच धंद्यांतील-अमुक काम उच्च व शुद्ध किंवा सिद्ध अशी त्यांतल्या होझान पूर्वीच्या एकजीव समाजाचे लोक निरनिराळ्या वर्णात व उपवर्णात एकमेकांपासून तुटक नांदूं लागले; आणि ज्यानें त्यानें आपापल्या वर्णातच शरीरसंबंध व अन्नव्यवहार केला पाहिजे, ज्याचा ज्या वर्णात जन्म त्याच वर्णाचा व्यवसाय त्यानें वर्णधर्म म्हणून केला पाहिजे,इतर यवसाय करणें अधर्म होय, असले कडक नियम अमलांत आले. त्यांनीं थम समाजांतील सर्व वर्णात होणारा बेटीव्यवहार नंतर रोटीव्यवहार नंतर शिवताशिव कमी केली; आणि चार वर्णातून अनेक उपवर्ण ऊर्फ जाती उत्पन्न केल्या. वर्णाप्रमाणें जातिजातींचेही विवक्षित धंदे व आचार पडत गेले, आणि ते जातिधर्म म्हणून ज्या त्या जाती पाळू लग्ल्या. जातींतल्या कांहीं लोकांनीं कांहीं धंद्यांतून किंवा मूळ धंद्याच्या ग्रेडया किंवा त्रासदायक भागांतून अंग काढून घेतलें. तसें ज्यांनीं केलें नाहीं किंवा असलीं कामें ज्यांनीं पत्करलीं, त्यांच्या कमी दर्जाच्या पोटजाती बनू लागल्या. वर्णातून ज्या कारणांनीं जाती निघाल्या, त्याच कारणांनीं जातींतून पोटजाती निघाल्या, आणि रूढीनें सर्व व्यवसाय, पोटव्यवसाय व त्यांतील निरानराळीं कामें ह्यांना जातिधर्माचें स्वरूप देऊन टाकलें. ही समाजविभंजक परंपरा जाति पोटजातींवर मुक्काम प्रती तरी बरें होतें. एखाद्या जातीनें दुस-या एखाद्या जातीचा किंवा पोटजातीचा व्यवसाय किंवा आचार उचलला, किंवा जाणून बुजून अथवा नकळत आचारस्खलन केलें, किंवा मूळ धर्माहून किंचित भिन्न असा एखादा उपधर्म किंवा संप्रदाय पत्करला, किंवा शेजारीं नादत असलेल्या परधर्माच्या मतांपैकीं किंवा उपासनेपैकीं एखादा भाग स्वीकारिला, कीं त्या जातींत अगर पोटजातींत तट पडत; व तेवढा आचार,