पान:अशोक.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना- (मूळ इंग्रजीवरून मराठीत भाषांतर ). भारतवर्षांतील पुण्यश्लोक नृपतींच्या मालिकेंत मेरूप्रमाणे शोभणाऱ्या अशोक राजाच्या चरित्राप्त ही प्रस्तावना लिहिण्यांत एवढाच उद्देश आहे की, भूतदयेनें अंत:करण द्रवून ज्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व त्या धर्माचा प्रतिपालक बनून तत्प्रसारार्थ नानाप्रकारे श्रम केले, अशा त्या नृपश्रेष्ठाच्या आंगच्या विविध गुणांचा परिचय करून घेण्याची लालसा उदारधी महाराष्ट्र वाचकांमध्ये उत्पन्न करावी. अशोक हा मूळचा ब्राह्मणधर्मी होता. परंतु पुढे निग्रोध नामक तरुण शामनेश (बौद्धगुरू ) ची सत्वशील वृत्ति पाहून त्याची बौद्धधर्माकडे प्रवृत्ति झाली. निग्रोधाने त्याला बौद्धधर्माचा उपदेश केला; आणि सत्य आणि पावित्र्य यांच्या शोधास लागण्याकडे त्याच्या मनाची प्रवृत्ति केली. अशोकाने जे आदेश पुढील पिढ्यासाठी ह्मणून ठेविले आहेत, त्यांत जगद्गुरू (बुद्ध ) च्या उपदेशाची तत्वे थोडक्यांत आणिली आहेत. अशा प्रकारचे लेख मिसर, ग्रीस, रोम, बाबिलोन, असीरिया, आरवस्थान, इराण, चीन, पालिस्टैन, यांपैकी एकाही देशांत आढळत नाहीत. आजपर्यंत अशोक असा एकच होऊन गेला. आणि आयोवात होऊन गेलेल्या सर्व थोर नृपतींत तो अग्रगण्य होता. बुद्ध, धर्म आणि संघ या तीन गोष्टीवर त्याची निष्ठा किती दृढ होती, हे त्याने आपला प्रियपुत्र महिंद आणि कन्या संघमित्रा यांना धर्म- प्रचारक ह्मणून सीलोन बेटांत पाठविलें, या एका गोष्टीवरून चांगले व्यक्त होते. महिंद व संघमित्रा यांनी प्राचीन ताम्रपर्णी येथे जाऊन भतदयाविशिष्ट बौद्ध महाधर्माची स्थापना केली आणि इक्ष्वाकुवंशोद्भव