पान:अशोक.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरित. १३', १९०१ सालीं सरकारनें जमीनमहसुलाच्या कायद्यांत दुरुस्ती करून असें ठरविलें आहे कीं, विशिष्ट रयतेला नवीन जमिनी देतांना अशी शर्त घालावी कीं, त्या त्यांना सरकारच्या परवानगीवांचून गहाण, खरेदी किंवा बटाईनें देतां येऊं नयेत. तेव्हां मिरासदार आणि उपरी ह्यांऐवजीं आतां कुणब्यांचे जुन्या शतींचे म्हणजे गहाण, खरेदी देणें वगैरे हक असणारे खातेदार, आणि नव्या शतींचे म्हणजे सदरहु हक नसणारे खातेदार असे दोन वर्ग झाले आहेत. कुणब्यानें गांव वसविलें, आणि काळी उचलली खरी; तथापि त्याचा धंदा पार पाडण्याला व प्रपंचाचीं अनेक कामें चालण्याला त्याला अडाण्यांच्या जातिपरत्वें धंद्यांची गरज हेोती, म्हणून कुणब्यानें आपल्याबरोबरच गांवांत अडाणी आणिले. त्यांत पहिल्यानें कारू, व नंतर नारू आले. कारू हा शब्द * कार ” ( करणारा ) ह्या शब्दापासून निघाला आहे. ज्याची विद्या, कसब किंवा मेहनत, कुणबिकीला अथवा कुणब्याच्या सरकारी खासगी व्यवहाराला अवश्य असा धंदा करणारा तो कारू; आणि ज्याच्या धंद्यावाचून कुणब्याचें नडत नाहीं किंवा कचित् नडतें, असा धंदा करणारा तो नारू. कारूला बलुतदार किंवा बलुत्या आणि नारूला आलुप्तदार किंवा आलुप्त्या म्हणतात. गुजराथेंत त्यांना ' वसवईया’ व तेलंगणांत 'वेट्टीवाडू' म्हणतात. कारू व नारू निरानराळ्या जातींचे असतात, तरी ते एकमेकांना ' कारभाऊ ” “ नारभाऊ ” म्हणतात, आणि सर्वजण कुणब्याशीं मायलेंकरांचें नातें लावतात. कुणविकीच्या व समस्त गांव. कीच्या सामान्य तसेंच गांवक-यांच्या विशेष गरजा भागविण्यासाठीं कारू नारू जीं आपल्या जातिविहित कसबानुसार कामें करतात, त्यांजबद्दल मेहनताना म्हणून त्यांना दरोबस्त कुणब्यांकडून जो पिकाचा वांटा वंशपरंपरेनें मिळतो, त्याला अनुक्रमें बलुतें आणि आलुतें म्हणतात. बलुत्याआलुन्यालाच आय, घुगरी, पेंढीकाडी, सळई, भिकणें, शेर, हक, इत्यादि प्रतिशब्द आहेत. ज्यांना बलुतें मिळतें ते