Q94 गांव-गाडte हें विसरतां कामा नये. हे लोक अनाद कालापासून विकट परिस्थितीशीं झगडून संसारयात्रा करीत असल्यामुळे नानातन्हेचें-विशेपंतंः शेती, वनस्पति, मनुष्य-पशु-पक्षी-वैद्यक इत्यादींचें-ज्ञानभांडार त्यांच्या तोंडांत व दिल-दप्तरांत नुसतें खेळत आहे. जर साक्षर मंडळी नमतें घेऊन त्यांच्याच सुतासुतानें घेतील तंर ह्या वंस्तुं स्थितीविषयीं त्यांची बालंबाल खात्री झाल्यावांचून राहणार नाहीं. तसेच मानापमान गुंडाळून ठेवून जर संशोधक व सुधारक रानोमाळ हिंडू त्यांच्यामध्यें मिसळतील तर नानाविध सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक माहितीचीं किती तरी मनोरम व बिनमोल लेणीं ह्या नैरक्षर्य-पर्वताच्या उदरांत दडून राहिलीं आहेत, हें त्यांना कळून येऊन विलक्षण ज्ञानानंदाचा अपूर्व आस्वाद लाभेल ह्यांत संशय नाहीं. तेव्हां ह्या बाहेर राहिलेल्या भरिताचाही थांग व व्यवस्था लावणें त्वरित व देशहितास्तवच नव्हे तर मानवधर्मपालनास्तवही अत्यंत इष्ट आणि अवश्य आहे. ठिकठिकाणच्या लोकाग्रणोंनीं मनावर घेतलें तर एक दोन तपांत बाताबेताच्या खर्चानें हैं काम बरेंच उठेल; आणि ते त्याला हातभार लावतील अशी उमेद बाळगण्यापुरतीं सुचिन्हें क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. कारण आपल्या समाजांतले अनेक भाग चहूंकडून खडबडून जागे झाले आहेत, आणि कित्येक तर कुंकून रस्ताही चालू लागले आहेत. तरी गांव-गाड्यानें धरलेली वाट बरोबर आहे किंवा नाहीं? नसल्यास कोठं व कशी दिशाभूल झाली, ह्याचा निर्णय देण्यासाठीं अधिकारी मार्मोपदेशकांना नम्रतेनें फूल लावून त्यांचा शकुन मिळेपर्यंत तूर्त येथेंच तो सोडूं या. ܕܒܸܩ
पान:अशोक.pdf/301
Appearance