पान:अशोक.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भरेित. १.१: तनखा वसूल होत नसे. ह्यामुळे गांवच्या हिशेबांत कोठं फाजील निघे, तर कोठं बाक्या ओढाव्या लागत. ही अव्यवस्था मोडण्यासाठीं मराठे वसूल आला त्याचा दाखला काढून तोच गांवच्या तनख्याऐवजीं कायम केला, आणि त्याला 'कमालआकार' हैं नांव दिलें. कमालआकारांत कमजास्त करून सालोसाल जो ऐन वसूल करीत, त्याला ‘वसुली आकार? म्हणत. कारणपरत्वें मिरासी जमिनी उप-या झाल्या, आणि कौलदारांनीं कुल जमिनीचा-मग तिच्यांत पेर होवो कां ती अंशतः किंवा सर्वस्वी पडित राहो-सरकारसारा देण्याच्या कबुलायती करून देऊन हळुहळू उप-या जमिनी मिरासींत चढवून घेतल्या, असे दाखले मिळतात. इ. स. १८१८ सालीं असें दिसून आलें कीं, पुण्यासाता-याच्या आजूबाजूला जिकडे तिकडे मिरासीच मिरासी जमीन; तेंच आडवळणी सुभ्यांत उपरी जमिनीचें क्षेत्र उमाप होतें. असेो. ह्याप्रमाणें कुणब्यांचे मिरासदार आणि उपरी असे दोन विभाग झाले. असो; परंतु मराठेशाहीच्यापूर्वीच तें महाराष्ट्रांत सरस प्रचारांत होतें. तुकोबा म्हणतात, 'हे माझे मिरासी । ठाव तुझ्या पायापाशीं ॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥. ' मिरासी व मिरासदार ह्यांमध्यें केवढा आत्मभाव प्रदीप्त झाला होता, हें वरील अवतरणावरून दिसून येण्यासारखे आहे. मिरासदारांचा दर्जा फार उंच मानीत. ते ठरलेला धारा देऊन वंशपरंपरेनें जमीन धारण करीत. मिरासीवरील सारा सरकारला वाढवितां येत नसे. परंतु तिच्यांत पेर होवो वा न होवो तिजवरील सरकारदेणें चुकत नसे. सारा येत असे तोंपर्यंत सरकाराला मिरासदाराकडून जमीन काढतां येत नसे, आणि यदाकदाचित त्याकडे सारा थकला तरी देखील मिरासदार तीस वर्षावर परागंदा झाल्याशिवाय मिरास जमीन अजीबात खालसा करण्याचा सर