Jump to content

पान:अशोक.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घTट-चालट० ՀՏԿ धंदा भरभराटींत असलेली गांवें फार थोडी आहेत. म्हणून कुणबीक हा प्रधान धंदा धरून खेड्यांतल्या शाळांचा शिक्षणक्रम मुक्रर केला पाहिजे. असली अटक गुन्हेगारांच्या शाळांना नाहीं. गुन्हेगार जातींना प्रतिष्ठित जातक्स्व मुळीच नाहीं. नवट जमिनीमध्यें वाटेल ती सोय व उदीमें काढता येतात. सुधारलेल्या आउतांचा कुणब्यांमध्यें प्रसार होण्याला मुख्य अडचण ही आहे कीं, त्यांचा एक खिळा निघाला किंवा टांचा उसवली तर गविच्या सुतार-लोहार-चांभारांना तें काम नीट करतां येत नाहीं. सुधारलेली हत्यारें नवीन व दुरुस्त करणा-या कसब्यांचा गांवोगांव भरपूर पुरवठा करण्याची सोय झाल्यावांचून आमची शेती व दुसरे धंदे ह्यांची उन्नति होणार नाहीं. ह्या शिक्षणाची सोय गांवगन्नाच्या शाळेत होणें *ाज तरी अशक्य दिसतें. निदान तें अशक्य नसलें तरी मनस्वी खर्चार्च आहे,आणि इतका खर्च करण्याला लोकलबोर्ड-म्युनिसिपालिट्यांसारख्या 'ंनी आज सवड आहे असें दिसत नाही. गुन्हेगारांच्या शाळांत जर སྔོ་ 'क्ष' मुख्यत्वें दिलें तर अशा शिक्षितांना पटापट काम मिळून चांगली पैदास होईल, व गुन्हा करण्याची हुकी फारशी येणार नाही; आणि कृष्णूब्यांचीही अडचण व गैरसेीय दूर होईल. कामकुचरपणा, उद्यांची ' * *", दुस-यावर विसंबणें, कामाचा बाट धरणें, उत्कृष्ट कामकरी नैन'याच्या महत्वाकांक्षेचा अभाव वगैरे जे दोष आमच्या मजुरांत दिसतात, ते घालविण्याचा प्रयत्नही ह्या शाळांत नेटानें झाला पाहिजे. दिलेल्या चित्रांत दुरस्ती करणें आणि को-या कागदावर नवीन चित्र काढणं ह्यांत जें अंतर आहे, तेंच विवाक्षत परिस्थितीत वाढणा-या मुलांचें शिक्षण आणि मनांत आणूं ती परीिस्थिति निर्माण करूं अशा स्थितींत वाढ्णा-या मुलांचे शिक्षण ह्यांत आहे. तेव्हां ह्या वहिमी मुलांच्या शाळा देशाला जितक्या प्रकारें उपकारक होतील तितक्या कराव्या अशी सरकारास नम्र विनंति आहे. कचित असें घडतें कीं, गुन्हेगार जातींच्या लोकांनीं प्रामाणिकपणानें उद्योग करण्याचें मनांत आणिलें तरी त्यांना कोणी जवळ करीत नाहीं.