वाट-च्वाल, マリー。 गाडा हांकला पाहिजे. सर्व धंदे जातिधर्म होऊन बसल्यामुळे एका जातीच्या इसमाला दुसरीच्या धंद्यांत प्रवेश करण्यास पुष्कळ अडचणी येतात. सबंध इलाख्यांत कलाभुवनें हातानें मोजण्याइतकीं देखील नाहींत ! आणि त्यांतही नियमित विद्याथ्र्यांना प्रवेश ! ! धंदा शिकण्याला सुतार, लोहार, चांभाराकडे तदितरानें जावें तर ते म्हणणार कीं 'तुम्ही आपला वडिलार्जित धंदा करा, आमचा धंदा हिरावून घेऊन आम्हांला भीक मागावयाला लावणार कीं काय ?? ब्राह्मणाला सुतार-कारकुनाचें बरें वाटत नाहीं, कुणब्याला ब्राह्मण-नांग-या खपत नाहीं, शिंप्याला सोनारशिंपी पहावत नाही; फार काय ख्रिस्ती झालेले महारसुद्धां मांगांना गुरें ओर्दु किंवा फाडूंदेत नाहीत!! ह्याप्रमाणें कोणीही आपलें कसब इतरांला दाखवीत नाहीं. जोंपर्यंत वाटेल त्याला वाटेल तो धंदा शिकण्याला साधनें मुबलक नाहींत, तोंपर्यंत लोक जातश्धंदा सोडीत नाहींत ह्याबद्दल त्यांना दोष देतां येणार नाहीं. सरकारानें शाळा काढून कारकुनी धंद्यांत ब्राह्मणेतर जातींचा शिरकाव होण्याची तरतूद केली आहे.परंतु तीही अद्यापि यशस्वी झाली नाहीं. शाळेत मुलें घालणें हें आपल्या पिढीजाद धंद्यापेक्षां जास्त किफायतशीर असेल तरच ब्राह्मणेतर आपलीं मुलें शाळेत घालतील. तशी किफायत होण्याला त्यांच्या डोळ्यांसमोर जें साधन दिसतें तें सरकारी नोकरी होय. ती मिळण्याइतकें शिक्षण देणा-या शाळा सबंध तालुक्यांत फार तर दोन काचत् तीन असतात. तेव्हां पुरतें लिहिणें येणें आपल्या आटोक्याबाहर आहे असें म्हणून निरक्षर जाती आपलीं मुलें शाळेत घालण्याच्या भरीस पडत नाहींत. पुष्कळांचा असा अनुभव आहे कीं, दिवसांतून पांच सहा तास शाळेच्या सावलींत बसल्यामुळे रानांत हिंडणा-या मुलांपेक्षां शाळेत जाणारा नरम पडतो, त्याला ऊन्ह-वा-यांत, थंडी-पावसांत काम करण्याचा सराव लागत नाहीं, अंगमेहनत करण्याची लाज वाटते, व त्याची मिजास वाढते. इकडे लिहिणें पुरें झालें नाहीं म्हणून नोक्री मिळूत नाहीं! तिकडेमळखाऊ शेतकाम, सुतारकी,मजुरी,पायपीट वगैरे होत नाही, व खूचे मात्र आधक करावासा वाटतो, आणि त्याच्या निरक्षर बंधूंचा प्रपंच त्याच्यापेक्षां चांगला चालतो. सबब निराक्षरापेक्षां साक्षरांचा संसार जास्त
पान:अशोक.pdf/290
Appearance