पान:अशोक.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Na भारत.

  • षष्ठांशवृतेि? हा राजाचा प्रतिशब्द होऊन बसला. हिंदु

होते. तेव्हां अंमलांत काळी पुष्कळ आणि कुणबी थोडे व्हा गतकुळा अगर वेवारशी जमिनीची लागण जी करी, तोच तिजवर वारसा सांगे आणि सरकारला तिजबद्दल लढाई वगैरे धामधुमीच्या साली पिकाची चौथाई, आणि एरवींच्या सामसुर्माच्या वेळीं साहोत्रा देई. ह्याप्रमाणें करभार घेऊन राजे प्रजापालन करीत, ज्याला त्याला स्वकष्टार्जित संपत्तीचा भोगवटा घेण्याची सोय करून देत, आणि अपहार करणा-या दुजेंनांचें पारंपत्य करीत. पुढे राजकारण वाढत जातां जातां मुसलमानी रिआसतींत जमिनीची पूर्ण मालकी राजानें आपल्याकडे ओढली असावी. कारण ' खलक खुदाका मुलख पादशहाका' (विश्व परमेश्वराचें आणि मुलूख राजाचा), 'बेटी बापाची जमीन बादशाहाची, ? ह्याप्रमाणें लोक बोर्ल लागले. मुसलमानी राज्यकत्यौनीं जमिनीची पहाणी व मोजणी करून सरकारसारा ठरविण्याचा प्रयत्न केला. तैमूरची वसूलपद्धति म्हणून कांहीं ठेोकळ नियम होते. शीरशहानें त्यांत सुधारणा करून जमिनीची आकारणी ठरावली. अकबर बादशहाच्या कारकीर्दीत राजा तोडरमल ह्यानें * इलाही गज ” नांवाचें जमीन मोजण्याचें प्रमाण निश्चित करून ' कानुगो ” ( जमाबंदीचे मुख्य कामगार) नेमले, आणि सर्व प्रांतांतील जमीनीचें वर्गीकरण व वसूलआकारणी केली. ह्या वसूलपद्धतीस ' असल-इ-जमा-इ-तुमार? असें नांव आहे, हिलाच दक्षिणेंत ' तनखा ' म्हणतात. पूर्वी तांब्याचा टका घेत होते. त्याऐवजों रुप्याचें तनखा। नांवाचें नाणें ध्यावें असें ठरविलें म्हणून ह्या पद्धतीचें नांव तनखा असें पडलें. हिच्या अन्वयें कुलकाळी सरकारची ठरवून तिच्या उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा तीन प्रती लाविल्या, आणि रयतेनें स्वामित्वाबद्दल चौथाई उत्पन्न नक्त द्यावें असा धारा घातला. राजा तोडरमल ह्याची कायम धारेबंदी लोकप्रिय झाली असा इतिहास आहे. इ. सन १६०७ तें १६२६ च्या दरम्यान निजामशाहीमधील सुप्रसिद्ध मुत्सद्दी, चांदबिबीचा विश्वासु नोकर,