गांव-गाडT. नियम असुं शकेल; जसें, क्षत्रियाचा धंदा पतकरला तर रणांत बापाची देखील भीड धरूं नये. परंतु वैयक्तिक गुणांचा उपयोग न करतां अमुक कुडीत जन्मास आला म्हणून अमुक धंदा केला पाहिजे, अशी ईश्वरी इच्छा नसावी. कारण कोणताही देव असें सांगणार नाहों कीं, मांगाच्या पोरांनीं चो-या कराव्यात, अगर कोल्हाटणीनें व्यभिचार करावा. आईबापांचा प्रामाणिक धंदा करण्यांत आईबापांचा व मुलांचा पुष्कळ फायदा असतो, म्हणून पिढीजाद धंदे व जातर्धदे आस्तित्वांत आले; आणि त्यांवर मारुतीच्या शेंदराप्रमाणें धर्माचें कवच चढलें. परंतु पिढीजाद धंदा मुलाला साध्य होण्यासारखा किंवा किफायतशीर नसला तर त्याला दुसरा धंदा पाहतां येऊं नये हा शुद्ध जुलूम आहे. तसेंच, नैसर्गीिक किंवा संपादित गुणांमुळे एखाद्यानें एखादा धंदा धरणें किंवा सोडणें निराळे, आणि अमुक आईबापांच्या पोटीं जन्मास आलों म्हणून त्यांचा धंदा देवानें आपल्याला लावला, दुसरा धंदा आपल्याच्यानें होणार नाहीं, अशा धर्मोपदेशावर वडिलोपार्जित धंद्याहून इतर धंद्यासबंधानें शारीरिक, मानसिक व नैतिक अपात्रता व्यर्थ कबूल करणें निराळें. तेव्हा व्यवसायाला जातधर्माचें बंधन नको. ज्या त्या व्यक्तीला आपापल्या शांरीरिक,मानसिक, आणि.सांपत्तिक अनुकूलतेप्रमाणें योग्य तो धंदा करण्याची पूर्ण मुभा पाहिजे. त्याशिवाय धंद्यांमध्यें हछीं जी कामक-यांची विषम वांटणी दिसून येते ती नाहीशी होणार नाहीं. सुधारणेची सर्व मदार व्यक्तिस्वातंत्र्यावर असते. तें ज्या समाजांतू नाहीं त्याच्या चलनवलूनाचें क्षेत्र आंत आंत येत जाऊन अखेर तो नामशेष होतो हें प्रमाणसिद्ध आहे.व्यक्स्व्तिंत्र्यू म्हणजे समाजाहत्वुधनास जरूर तितकीं निर्बंधनें पाळून वागण्याचा म्कळक्र. त्रूसुा. ह्याप्रमाण जात आणि धंदा ह्यांची फारकत झाली म्ह्णजे ज्ञातिधमचे सूतोम पुष्कळ कमी होईल, बहाणी जातांना भरपूर उद्योग भटलू आणधमाच्या नावावर् चालत असलेले अनेक अना-चार व दुराचार ह्याना बदात ट्क्लल्या अनंक अज्ञजनांची मुक्तता होईल. सध्या जात्पुिरिषदा व संमेलुने भरत आहेत. त्यांनीं मनावर घेतल्यास वर सुचविलल्या सुधारणांपर्की पुष्कळ त्यांना धर्माचार्यांच्या तोंडा
पान:अशोक.pdf/277
Appearance