Jump to content

पान:अशोक.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R8& गांव-गाडा. असल्या गुणांचा समाजाला उपयोग होऊं नये ह्यापरतें ह्या जातींवर, त्यांतील लोकांवर व आमच्या एकंदर समाजावर दुर्दैव तें कोणतें ओढवणार ! ! ! पूर्वीच्या राजवटींत जातिजातींचीं व गांवकीचीं बंधनें फार कडक असल्यामुळे आणि कायद्यांचा इतका कीस काढीत नसल्यामुळे जातिजातींच्या उपद्यापांवर एकदरं जनतेचा बराच सत्त दाब असे. व्यभेिचारी जातींनीं घरंदाज कुटुंबांतली बाई काढून नेली तर वेळेला गांवकरी सबंध जातीला ठोकून काढावयाचे, त्यांचीं पालें जाळावयाचे, व पुनः त्यांना गांवांत पाऊल घालू द्यावयाचे नाहींत. 'मारक्या म्हशीच्या माथां घाव’, ह्या न्यायानें गांवमुकादमानींत वहिमी दरोडेखोरांना सुळावर चढविण्यांत पुराव्याची कमतरता आड येत नसे. म्हणून सर्व गुन्हेगारांना अलोट जरब असे. गुन्हेगार व व्यभिचारी जाती पुष्कळ ठिकाणीं वतनदार होत्या. दळणवळण जुजबी असल्यामुळे सर्वच समाजांत एकमेकांना एकमेकांची मुरवत असे, अपराध दडविण्यास सवड नसे, आणि गुन्ह्यांचा बोभाटा तेव्हांच होई. पूर्वी खर्चाच्या व चैनीच्या बाबीही थोडया असत, व मादक पदार्थाची आतांप्रमाणें बंदी नसे. त्यामुळे पेंढार, बंडखोर सोडले तर गुन्हेगार जातींची भूक खाण्यापिण्याच्या किंवा थोड्याफार कपड्यांच्या व पैशाच्या नडीपलीकडे नसे. त्यामुळे बहुतेक गुन्हे पोटासाठीं होत. आतां सर्वच बदललें, आणि गुन्ह्यांना व्यापारी स्वरूप आलें आहे. पूर्वी महार फार झालें तर मांसासाठीं, जोड्यापुरत्या कातड्यासाठीं, किंवा किरकोळ अदावतीनें एकाददुसरें जनावर मारीत. व्यापारानिमित्त । हिंदुस्थानांत दरवर्षों सुमरें सवाकोट जनावरें मरतात, पैकीं अर्धलाख मुंबई इलाख्यांत मारलीं जातात, आणि त्यांची किंमत पंधरा वीस लाख रुपय यत. हर्ड कात्ड व ह्यडर्क मिळून दरसाल सवा दीड लारव मण माल परदेशों जाती. बहुतेक कतर्ड अमेरिका व जर्मनीत जातें आणि त्याला भावही चांगला येतो. यासुळें गुरें मारणें हा एक रोजग झाला आहे, आणि हाडकाकातड्यांचे व्यापारी महारमांगांना पैसे र चारून