पक्रन्लगत० ఇం तोच कुणबी आणि अडाणी ह्यांचा होता व आहे. एकत्र कुठुवांत नाहीं म्हणण्याला जिव्हाळ्याची, आंतड्याकातड्याचीं माणसें तरी असतात. गांवगाड्यांतील खुष्टांत फूट पाडण्यास कुटुंबभेद, जातिभेद, हितभेद वगेरे किती तरी स्फोटक कारणें आहेत. घटकाभर असें मानलें कीं, गांव वसविणारे कुणबी आणि त्यांचे अडाणी सहकारी अगदीं जिवास जीव देणारे होते, तरी हा भाव त्यांच्या वंशजांत किती पिढ्या, किती शतकं टिकणार हें गांवगाड्याच्या अभिमान्यांनींच प्रांजळपणें ठरवावें. 'तुझें तें माझें आणि माझें तें तुझें ? ह्या भावनेच्या आंखावर गांवगाडा भरला, आणि कुणबी व अडाणी ह्यांची शेत-उत्पन्नांत सरकत ठरली. ही भावना जसजशी कमजोर होईल किंवा युगांतरानें कुणब्याला अडाण्यांचा उपयोग कामकमतरतेमुळे, कसबकमतरतेमुळे किंवा कामकुचराईमुळे जसजसा कमी होईल तसतशी ही सरकत तुटली पाहिजे, किंवा तिची आणेवारी तरी फिरली पाहिजे. स्वराज्यांत गांवच्या दरएक बाबतींत जरी सबंध गांव एकजथ्यानें जबावदार धरला जात असे, तरी त्यांत जे कोणी भेंड़े असतील ते पुढें होऊन सर्व भार भिडस्त कुणब्यावर घालून गांवची' जबाबदारी पार पाडीत. ‘गांवापुढें कोठं जावें’ असें म्हणून तो स्वस्थ बसे, आणि त्याला कोणी बोल बोलूदेत नसे. कधीं असेंही होई कीं, राजाधिकारी, मधिकारी किंवा बंडखोर एखाद्या गांवक-याबद्दल किंवा सबंध गांवाबद्दल गुन्हेगारी अगर लूट गांवच्या पुढाज्यांपासून घेत, आणि इतर हिस्सेरशनें व्याची भरपाई करीत. पण ' राखील तो चाखल ? ह्या वहिवाटीप्रमाणें पुढाईतांच्या पदराला खार न लागतां अशा बाबतींत त्यांचा उलट लाग लागे. त्याचप्रमाणें कांहीं गांवकीचा खर्च निघाला तर तो यथान्याय सर्वच देत, असें घडत नव्हतें. संभावितावर त्याचा भार पडावयाचा आणि कलभांड निसटून जावयाचे, असली त्याची हिस्सेरशी सामान्यतः होत असे. कुणबी आणि अडाणी ह्यांच्या बोजांची वांटणी बहुधा कुणब्याला प्रतिकूल होत असे. त्याचें उत्पन्न डोळेफोड असल्यामुळे त्याला हरभज्याच्या झाडावर चढवून देऊन बहुधा अलाय-बलाय अडाणी त्याच्यावर
पान:अशोक.pdf/226
Appearance