Jump to content

पान:अशोक.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

କ୍ ର ୫ गांव-गाडा. कळकळीनें हात द्या, जिव्हाळ्याच्या स्वकीयांना विनाकारण डावलून परकीयांना जवळ करूं नका, आणि एका दिव्याखालीं दहाजण इमार्नइतबारें आनंदानें नांदा. पण केवळ स्वकीय आहेत म्हणून त्यांना निरुद्योगी ठेवून त्यांचा भार युर्गेच्या युर्गे वाहण्यानें व त्यांच्या दुर्गुणांवर पांवरूण घालीत राहण्यानें नुसती कुटुंबहानिच होते असें नाहीं तर समाजावनतिही होते, ही गोष्ट पकी लक्षांत ठेवा. गांवगाडा म्हणजे एकंदर गांवचें एकत्र कुटुंब; त्यांत कुणबी हा कारभारी, स्थायिक वतनदार हे कुटुंबीय, आणि फिरस्ते सोयरे किंवा इष्टमित्र असा घाट दिसून येतो. वेळीं अवेळीं परदेशस्थ-प्रवाशी आमच्या गांवगाड्याचे फार स्तुतिपाठ गात आले आहेत, आणि त्यावरून आम्ही आपली अशी समज करून घेतों कीं, एका काळीं आमचा गांवगाडा म्हणजे मानवी चातुर्याची पराकाष्ठा होती; आणि आतां इनामदार, वतनदार, जातीधंदे, वतनें नाहींशीं होत चालल्यामुळे त्यांत विघाड झाला आहे. गांवमुकादमानीत कांहीं वतनदारांची योजना सरबराईकडे असे. कोणी पांथस्थ आला तर त्याची बरदास्त गांवखर्चानें होई. त्याला शिधापाणी द्यावयाचें, व घोडे, गाडी, म्याना, वाटाडे, भोई वगैरे देऊन आपले हर्दीतून त्याची रवानगी करावयाची हा धारा असे. गांवचें उत्पन्न बहुतेक सर्वांना वांटलें जात असे, व गांवांतच अनाथ-अपंगांच्या अन्नवस्त्राची सोय लागे. तेव्हां 'दामाशिवाय काम नाहीं' अशा देशांतल्या पांथस्थांना फुकटच्या पाहुणचाराचे ढेकर देतांना आमचा गांवगाडा स्पृहणीय दिसला, तर त्यांत आश्चर्य तें कोणतें ? 'उपर खूप बने, अंदर राम जाने.' गांवकींतील काम व दाम ह्यांचा त्यांनीं जरा हिशेब पाहिला असता तर त्यांना असें आढळून आलें असतें कीं, गांवचा सर्व भार कुणब्यानें आपल्या माथीं मारून घेतला व अडाण्यांच्या कामाचा हिशेब न घेतां तो त्यांचा योगक्षम चालवीत आहे, आणि काम केलें केलें, न केलें न केलें, अशा बेजबाबदारीनें ते कुणब्याच्या जिवावर दिवस काढीत आहेत. एकत्र कुर्टबांतील कर्ते स्त्रीपुरुष व त्यांच्या छत्राखालचे नातलग ह्यांचा जो संबंध